माजी आमदार सावळे भाजपात
By Admin | Updated: August 22, 2015 00:44 IST2015-08-22T00:44:21+5:302015-08-22T00:44:21+5:30
बुलडाणा येथील काँग्रेसचे माजी आमदार धृपतराव सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात

माजी आमदार सावळे भाजपात
मुंबई : बुलडाणा येथील काँग्रेसचे माजी आमदार धृपतराव सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रदेश भाजपाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
याशिवाय, मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष गोरक्ष धोत्रे, विजय सरोज, चिंचपाडा (कल्याण-डोंबिवली) येथील मुकुंद म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, कल्याण-डोंबिवलीतील युवा सेनेचे शहर प्रमुख विक्रम तरे, सुधीर गायकर, नगरसेवक उदय रसाळ, राष्ट्रवादीचे नगरसेवक रणजीत जोशी, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड तसेच रिसोड येथील युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमोल नरवडे यांनीही भाजपात प्रवेश केला. (विशेष प्रतिनिधी)