Join us

'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 06:52 IST

आमदार असल्याने त्यांना मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही

मुंबई : सात वर्षापूर्वी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवत ३ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. आमदार असल्याने त्यांना मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही, असे न्यायालयाने बजावले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी कडू यांना १० हजार रुपयांचा दंडही सुनावला. उच्च न्यायालयात अपिल दाखल करेपर्यंत कडू यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. न्यायालयाने कडू यांना (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून रोखणे, हल्ला करणे) आणि कलम ५०६ (धमकी देणे) अंतर्गत दोषी ठरविले तर अपमानजनक भाषा वापरल्याच्या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली. 

टॅग्स :बच्चू कडूमुंबईन्यायालय