माजी मंत्र्यांच्या पीएची चौकशी सुरू
By Admin | Updated: November 27, 2014 02:06 IST2014-11-27T02:06:09+5:302014-11-27T02:06:09+5:30
आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्र्यांचे पीए प्रशांत अल्याडवार यांच्या कोटय़वधी रुपयांच्या कथित घोटाळ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे.

माजी मंत्र्यांच्या पीएची चौकशी सुरू
मुंबई : आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्र्यांचे पीए प्रशांत अल्याडवार यांच्या कोटय़वधी रुपयांच्या कथित घोटाळ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे. या चौकशीत काही अधिकारी आणि कंत्रटदार अडकण्याची शक्यता आहे.
अल्याडवार याआधीच एका प्रकरणात अडकलेले असताना आणखी काही प्रकरणांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी आल्या असून, त्यांचीही चौकशी सुरू आहे. सामाजिक न्याय विभागाच्या काही कंत्रटदारांच्या संबंधीत प्रकरणोही त्यात आहेत. या विभागाने 2क्11 मध्ये ई-स्कॉलरशिप वाटपाचे कंत्रट मास्टेक या आयटी कंपनीला दिले. मास्टेकने ते काम अल्याडवार यांची पत्नी ऋतुजा यांच्या सार आयटी रिसोर्स या कंपनीला उप कंत्रटदार दाखवून दिले. हे उप कंत्रट का देण्यात आले, त्यातून अल्याडवार यांना किती आर्थिक फायदा झाला, या बाबी तपासून पाहिल्या जात आहेत.
विद्याथ्र्याना नाइट ड्रेसेस पुरविण्याचे कंत्रट 2क्11 मध्ये मे. मीरा डेकोर आणि मे. गुणिना व्हेंचर्स या कंपन्यांना 1क् कोटी रुपयांमध्ये देण्यात आले. सात दिवसांच्या नोटिशीवर ही निविदा उघडण्यात आली होती. इतक्या घाईने ही कार्यवाही का करण्यात आली, याचीही चौकशी करण्यात येत आहे. तसचे चर्मकार बंधूंसाठी स्टॉल्स उभारणीच्या निविदा 2क्1क् मध्ये काढल्या, तेव्हा एका स्टॉलची किंमत 16 हजार दाखवली होती. त्यानंतर एकाच वर्षात ही किंमत 42 हजार कशी काय दाखवली, किंमत जवळपास तिपटीने का वाढविण्यात आली, यावर लाचलुचपत विभागाने चौकशी लक्ष केंद्रित केले आहे, असे सूत्रंनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
अल्याडवार आणि त्यांची पत्नी तसेच मुले एका कंत्रटदाराच्या खर्चाने स्वित्ङरलड आणि पॅरिसच्या ट्रिपवर गेले होते का, अल्याडवार यांच्या पत्नीचे कोलकात्याच्या दोन कंपन्यांमध्ये किती शेअर्स आहेत, या बाबीदेखील तपासून पाहिल्या जात आहेत.