Join us
Daily Top 2Weekly Top 5

खेरवाडीचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे दीर्घ आजाराने निधन

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 22, 2024 12:59 IST

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सरमळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुंबई : खेरवाडीचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज वांद्रे (पूर्व) टीचर्स कॉलनी जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सरमळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,जावई असा परिवार आहे. त्यांनी काँग्रेसमधून 12 मार्च 2011 रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला होता. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले ते महत्वाचे नेते आणि आमदार होते. 

टॅग्स :मुंबईआमदार