Join us  

मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 5:35 PM

Dr. Ram Barot : ढत्या वयातही सामाजिक कार्यात स्वतःला लोटून दिलेल्या डॉ. बारोट यांचे मालाडकरांशी कौटुंबिक संबंध होते.

मुंबई : मुंबईचे माजी उपमहापौर आणि मालाड प्रभाग क्रमांक ४५ चे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राम बारोट (वय ७५) यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

1992 पासून सलग सहा वेळा मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या डॉ. राम बारोट यांनी उपमहापौर पदासह पालिकेत सुधार समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष व आरोग्य समिती अध्यक्ष ही पदे सुद्धा भूषवली. मालाड विधानसभेमधूनही त्यांनी आमदारकीसाठी निवडणूक लढवली होती. मालाड पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या सबवेसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. 

हा सबवे म्हणजे मालाडकरांसाठी त्यांनी दिलेली ही एक अनमोल भेटच आहे. वाढत्या वयातही सामाजिक कार्यात स्वतःला लोटून दिलेल्या डॉ. बारोट यांचे मालाडकरांशी कौटुंबिक संबंध होते. डॉ. बारोट यांच्या निधनामुळे भाजपाने एक सच्चा कार्यकर्ता व निष्ठावान नगरसेवक गमावला आहे.

टॅग्स :भाजपामुंबई