Former Congress councilor Manoj Jamsutkar in the Sena after getting no nomination | उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर सेनेत
उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर सेनेत

मुंबई : भायखळा येथील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी गुरुवारी ‘मातोश्री’वर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या प्रचार धुमाळीत जामसुतकर यांनी सेनेत प्रवेश केल्यामुळे भायखळा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
जामसुतकर यांनी भायखळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी काँग्रेसकडे मागणी केली होती. ऐनवेळी पक्षाने माजी आमदार मधुकर चव्हाण यांना उमेदवारी दिली. जामसुतकर नाराज झाले. यानंतर अखेरीस जामसुतकर यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी पक्षात प्रवेश केला. जामसुतकर यांच्यासह भायखळा येथील माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जामसुतकर यांना माथाडी कामगारांचे मोठे पाठबळ आहे. जामसुतकर यांच्या पत्नी सोनम जामसुतकर या काँग्रेसच्या माझगाव येथील विद्यमान नगरसेविका आहेत. भायखळा विधानसभा मतदारसंघातून सेनेकडून यामिनी जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जामसुतकर यांच्यामुळे सेनेच्या मतांना फटका बसण्याची शक्यता होती; परिणामी विरोधकांना थेट सेनेत सामावून घेण्याचा मार्ग पत्करण्यात आला आहे. याखेरीज, या मतदारसंघात जाधव यांच्याविरोधात एमआयएमचे वारिस पठाण, काँग्रेसचे मधुकर चव्हाण आणि अभासेच्या गीता गवळी यांचे आव्हान आहे.

Web Title:  Former Congress councilor Manoj Jamsutkar in the Sena after getting no nomination

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.