Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर जोशी अतिदक्षता विभागातून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 06:56 IST

अस्वस्थ वाटू लागल्यानंतर मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते मनोहर जोशी यांची प्रकृती आता स्थिर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून हलविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे, अशी माहिती हिंदुजा रुग्णालयाकडून देण्यात आली. जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी आहे.

अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ८६ वर्षीय मनोहर जोशी यांना २२ मे रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य इत्यादी पदे भूषविली आहेत.

 

टॅग्स :मुंबई