बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:14 IST2021-01-08T04:14:13+5:302021-01-08T04:14:13+5:30

बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन नामंजूर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) चे ...

Former BARC CEO Partho Dasgupta's bail denied | बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन नामंजूर

बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन नामंजूर

बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन नामंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) चे माजी कार्यकारी प्रमुख व व्यवस्थापकीय संचालक पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळला. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.

दासगुप्ता यांना ३० डिसेंबर रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. आतापर्यंत या प्रकरणातील १४ आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच दासगुप्ता यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे जामीन अर्जात म्हटले आहे. मात्र, सरकारी वकिलांनी यावर आक्षेप घेतला. दासगुप्ता यांच्याविरोधात पुरावे असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत दासगुप्ता यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.

Web Title: Former BARC CEO Partho Dasgupta's bail denied