अपघातामुळे ओळखच विसरला

By Admin | Updated: February 13, 2015 22:49 IST2015-02-13T22:49:16+5:302015-02-13T22:49:16+5:30

तलासरी जवळ महामार्गावर असलेला दापचरी तपासणी नाका संवेदनशील असून येथून अवैधरित्या अवजड वाहने भरधाव निघून जातात.

Forgot to recognize due to an accident | अपघातामुळे ओळखच विसरला

अपघातामुळे ओळखच विसरला

तलासरी : तलासरी जवळ महामार्गावर असलेला दापचरी तपासणी नाका संवेदनशील असून येथून अवैधरित्या अवजड वाहने भरधाव निघून जातात. अशाच एका अज्ञात भरधाव जाणाऱ्या वाहनाने दापचरी तपासणी नाक्यावर रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. एवढेच नव्हे तर तो स्वत:च्या नावाखेरीज आपली ओळखच विसरला आहे. हिंदी सिनेमात नेहमी जसा याददाश्त खो जाना हा प्रकार घडतो तसे इथे प्रत्यक्षात घडले आहे.
तलासरी पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत सिल्व्हासा येथील विनोबा भावे रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांना त्याचा उजवा हात आणि डाव्या पायाचा पंजा कापून काढावा लागला. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याचा जीव वाचविला पण अपघाताने आणि शस्त्रक्रियेने तो आपली ओळखच विसरून गेला. या जखमी व्यक्तीची ओळख विचारली असता तो फक्त आपले नाव पप्पु जगन्नाथ सिंग एवढेच सांगतो. त्यामुळे त्याची ओळख पटवून त्यांच्या वारसाचा शोध लावणे पोलिसांना अवघड झाले आहे.
या अज्ञात पप्पू जगन्नाथ सिंग बाबत कोणाला काही माहिती असल्यास तलासरी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Forgot to recognize due to an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.