Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: मुंबईत भररस्त्यात परदेशी तरुणीची छेडछाड; २ तरुणांच्या कृत्याने संताप, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:46 IST

Viral News: भारताची आर्थिक राजधानी आणि महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरातून एक संतापजनक प्रकार समोर आला.

भारताची आर्थिक राजधानी आणि महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरातून एक संतापजनक प्रकार समोर आला. एका परदेशी तरुणी पर्यटकाचा दोन तरुणांनी सेल्फीसाठी तब्बल १५ मिनिटे पाठलाग केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संबंधित तरुणांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

इनेस फारिया ही परदेशी तरुणी गेल्या दोन महिन्यांपासून भारतात एकटी प्रवास करत आहे. इनेसने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रीलमध्ये मुंबईत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे, दोन तरुण इनेसकडे वारंवार सेल्फीची मागणी करत होते. तिने स्पष्टपणे नकार देऊनही त्यांनी सुमारे १५ मिनिटे ते तिचा पाठलाग केला. तसेच तिचा विनयभंग केला. अखेर स्वसंरक्षणासाठी इनेसने त्यांना दूर ढकलले. 

इनेसने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारतात गेल्या दोन महिन्यांपासून माझा अनुभव खूप चांगला आणि स्वागतार्ह होता, पण आजचा दिवस वेगळा ठरला. दोन तरुणांनी सेल्फीसाठी तब्बल १५ मिनिटे आमचा पाठलाग केला. मी नकार देऊनही तो ऐकत नव्हता. सुरक्षितता ही नेहमीच पहिली प्राथमिकता असली पाहिजे." हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणांच्या कृत्यावर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. एका म्हटले आहे की, "यापुढे तुमच्याजवळ एक पेपर स्प्रे घेऊन ठेवा." दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करा आणि हा व्हिडिओ पुरावा म्हणून दाखवा. त्याला कठोर शिक्षा होईल." तर, एका व्यक्तीने विदेशी महिलेसोबत घडलेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली. "तुमच्यासोबत जे घडले त्याबद्दल मला खूप वाईट वाटते", असे त्यांनी म्हटले.

मुंबई पोलिसांनी अद्याप यावर अधिकृत भाष्य केले नसले तरी, कलम ७८ अंतर्गत संमतीशिवाय पाठलाग करणे हा दंडनीय गुन्हा आहे. कलम ७४ अंतर्गत महिलेच्या संमतीशिवाय शारीरिक स्पर्श किंवा अयोग्य वर्तन केल्यास या कलमान्वये कारवाई होऊ शकते आणि कलम ७९ अंतर्गत महिलेच्या विनयभंगाच्या उद्देशाने केलेले शब्द किंवा हावभाव यासाठीही शिक्षेची तरतूद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Foreign woman harassed in Mumbai; netizens outraged by youths' actions.

Web Summary : A foreign tourist was harassed in Mumbai by two youths who stalked her for selfies. Despite her refusal, they persisted for 15 minutes, leading to outrage online. The woman shared her experience on Instagram, prompting calls for strict action against the perpetrators.
टॅग्स :व्हायरल व्हिडिओमुंबई