Join us  

खेळाडूंसाठी विदेश दौरा होईल सुकर - सुनील केदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 2:27 AM

शनिवारी गेटवे आॅफ इंडिया येथे महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती

मुंबई : कोणत्याही खेळाडूला परदेश दौऱ्यासाठी व्हिसा प्रक्रियेत अडचण निर्माण झाली, तर त्याने तत्काळ क्रीडा खात्याशी संपर्क साधावा. विदेश दौºयासाठी जाताना खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ,’ असे आश्वासन महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.

शनिवारी गेटवे आॅफ इंडिया येथे महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर केदार यांनी संवाद साधला. टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या अनेक वैयक्तिक खेळांतील खेळाडूंना बाहेरच्या देशांमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी जाताना अनेकदा व्हिसा प्रक्रियेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागतो. याविषयी विचारले असता केदार यांनी सांगितले की, ‘जेव्हा कधी खेळाडूंना अशा प्रक्रियेमध्ये अडचण येईल, तेव्हा त्यांनी क्रीडा खात्याशी संपर्क साधावा. खेळाडूंची अडचण तत्काळ दूर करण्यात येईल. केवळ पासपोर्ट-व्हिसाच नाही, तर आर्थिक मदतीसाठीही क्रीडामंत्री म्हणून माझ्याकडून खेळाडूंना पूर्ण सहकार्य मिळेल.’ अनेक खेळ विविध संघटनांच्या वादामध्ये अडकले आहेत. याविषयी विचारले असता केदार म्हणाले, ‘खेळांमधील विविध संघटनांच्या वादाकडे मी गंभीर्याने पाहत आहे. एकाच खेळातील विविध संघटनांमुळे खेळाडूंचे नुकसान होते. यासाठी मी स्वत: या प्रकरणी लक्ष घालून कठोर भूमिका घेणार आहे. प्रत्येक खेळातील संघटनांनी आपापसांत भांडण करून खेळाडूंचे नुकसान करू नये. जर असे होत असेल, तर क्रीडामंत्री म्हणून मी सर्वप्रथम कठोर कारवाई करेन. येत्या महिन्याभरात याविषयीची माझी भूमिका सर्वांसमोर येईलच.

टॅग्स :सुनील केदारभारतीय क्रिकेट संघ