कार्ड वापराची सक्ती!

By Admin | Updated: March 4, 2015 02:08 IST2015-03-04T02:08:17+5:302015-03-04T02:08:17+5:30

पंचतारांकित हॉटेलच नव्हे, तर यापुढे कोणत्याही दुकानात अथवा जिथे कुठे तुम्ही पाच हजार रुपये किंवा त्यावरील व्यवहार कराल, ते व्यवहार तुम्हाला तुमच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डावरून करावे लागतील.

Force card usage! | कार्ड वापराची सक्ती!

कार्ड वापराची सक्ती!

मुंबई : पंचतारांकित हॉटेलच नव्हे, तर यापुढे कोणत्याही दुकानात अथवा जिथे कुठे तुम्ही पाच हजार रुपये किंवा त्यावरील व्यवहार कराल, ते व्यवहार तुम्हाला तुमच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डावरून करावे लागतील. तसा धोरणात्मक निर्णय घेण्याचे संकेतच केंद्रीय वित्तमंत्रालयाने दिले असून, या निर्णयामुळे काळ्या पैशांच्या व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर चाप लागेल, असा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, असा निर्णय झाल्यास पहिल्या टप्प्यात त्यांची सुरुवात ही पंचतारांकित हॉटेलमधील व्यवहारांपासून होणार असून, त्यानंतर दिवाळीच्या तोंडावर सरसकट असा निर्णय घेण्याचे संकेत मिळत आहेत.
काळ्या पैशाच्या व्यवहारांना चाप लावण्याच्या दृष्टीने लवकरच काही उपायोजनांची घोषणा करण्यात येईल तसेच डेबिट अथवा क्रेडिट कार्डावरून होणाऱ्या व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सरकार लवकरच काही घोषणा करेल, हे विधान केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर त्या दृष्टीने आता वित्तमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी विविध संकल्पनांची मांडणी करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या डेबिट अथवा क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर संबंधित ग्राहकाला त्याचे पॅन कार्ड द्यावे लागते. तसेच हा व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असल्याने याची नोंद राहाते व बँक खाते अथवा अन्य संगणकीय यंत्रणांद्वारे याची पडताळणी करणे कर विषयक तपास यंत्रणांना सुलभ जाते. यातूनच मग व्यवहार तपासणी करणे या यंत्रणांना सुलभ होणार आहे.

काळ्या पैशांच्या व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर चाप लागेल, असा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे.
डेबिट, क्रेडिट वापरण्यास प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न.

Web Title: Force card usage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.