चलतचित्रद्वारे नेत्रदानाचा संदेश

By Admin | Updated: September 5, 2014 01:33 IST2014-09-05T01:33:14+5:302014-09-05T01:33:14+5:30

अनेक गणोशोत्सव मंडळांद्वारे विविध मनोरंजक कार्यक्रम, देखावे सादर करण्यात येतात.

Footnote message | चलतचित्रद्वारे नेत्रदानाचा संदेश

चलतचित्रद्वारे नेत्रदानाचा संदेश

>मालाड : अनेक गणोशोत्सव मंडळांद्वारे विविध मनोरंजक कार्यक्रम, देखावे सादर करण्यात येतात. मात्र याला अपवाद ठरत मालाड येथील रायपाडा मित्र मंडळाने नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे चलतचित्र तयार केले आहे.
 जळगाव येथील एका 14 महिन्यांच्या चिमुरडीचा नेत्रविकारानंतर तिला कुणाचेही नेत्रदान न मिळाल्याने मृत्यू झाला. याच घटनेवर आधारित हे चलतचित्र तयार करण्यात आले असून नागरिकांना अवयवदान करण्याविषयी माहिती देण्यात येत असल्याचे रायपाडा मित्र मंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले. मृत्यूनंतर दात सोडून सर्वच अवयव दान करता येऊ शकतात. यातील सर्वाधिक काळ टिकतात ते डोळे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के जनतेने नेत्रदान केले तर सव्वाकोटी अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, असा संदेश या चलतचित्रतून देण्यात येत आहे. याचबरोबर मंडळातील सर्व  कार्यकत्र्यानी नेत्रदानाचा निश्चय केला असून त्याप्रमाणो फॉर्मसुद्धा भरले आहेत.
   मंडळाचे यंदाचे 28 वे वर्ष आहे. रायपाडा परिसरातील नानाभाषिक नागरिक एकोप्याने या उत्सवात हिरिरीने भाग घेतात. यातील रमजान सैदुर इस्लाम हा शाळकरी मुलगा म्हणतो, मी लहानपणापासूनच मंडळाच्या गणोशोत्सवात काम करत आहे. मी मुस्लीम असलो तरीही गणपती बाप्पावर माझी श्रद्धा आहे. त्यामुळेच मी श्रद्धेने 11 दिवस मंडळात गणपतीच्या आरतीपासून, चलतचित्रमध्ये पुतळे हलवणो ते लाइट आणि संगीताची जबाबदारी पाहतो.’
  आठवीत शिकणारा सुलतान रझाक शिकलगार म्हणतो, ‘मला आई-वडील नाहीत. मी मावशीकडे राहतो. गणोशोत्सवाच्या काळात माङो मन प्रसन्न असते. मला प्रसाद वाटायला फार आवडते, म्हणून दिवसभर मी मंडपात बाप्पाच्या दर्शनाला येणा:या भाविकांना प्रसाद वाटतो. यातून मनाला एक वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते.’
पर्यावरणाचे भान राखून गेल्या पाच वर्षापासून इकोफ्रेंडली शाडूच्या मातीची गणोशमूर्ती येथे आणली जाते. यंदा अष्टविनायकांपैकी एक असलेल्या चिंतामणीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. संपूर्ण देखावा हा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आला आहे. गेला महिनाभर सर्व कार्यकर्ते या कामकाजात दिवसरात्र एक करत आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय तुळसणकर आणि सचिव संदीप बिरवटकर यांनी दिली. यंदाच्या मूळ चलतचित्रची संकल्पना बिरवटकर यांचीच आहे.

Web Title: Footnote message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.