दारिद्र्यरेषेवरील वंचित कुटुंबांनाही अन्न सुरक्षा

By Admin | Updated: May 22, 2014 03:56 IST2014-05-22T03:56:52+5:302014-05-22T03:56:52+5:30

राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयकानुसार जिल्ह्यातील सुमारे ४७ लाख ९२ हजार ६५० लाभार्थींसह अंत्योदय योजनेच्या सुमारे एक लाख ९३ हजार ५१२ लाभार्थींना सवलतीनुसार अन्नधान्याचा लाभ दिला जात आहे.

Food security for the deprived families of the poorer families | दारिद्र्यरेषेवरील वंचित कुटुंबांनाही अन्न सुरक्षा

दारिद्र्यरेषेवरील वंचित कुटुंबांनाही अन्न सुरक्षा

सुरेश लोखंडे, ठाणे -  राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयकानुसार जिल्ह्यातील सुमारे ४७ लाख ९२ हजार ६५० लाभार्थींसह अंत्योदय योजनेच्या सुमारे एक लाख ९३ हजार ५१२ लाभार्थींना सवलतीनुसार अन्नधान्याचा लाभ दिला जात आहे. परंतु या लाभापासून वंचित असलेल्या एक लाख २१ हजार २४९ दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) कुटुंबांना या महिन्यापासून प्रति किलो नऊ रूपये ६० पैसे दराने अन्नधान्य मिळणार आहे. राष्टÑीय अन्न सुरक्षा विधेयकासाठी जिल्ह्यातील प्राधान्यक्रमाचे १८ लाख ९७ हजार २९० लाभार्थी प्रस्तावित करण्यात आले होते. यापैकी १७ लाख सात हजार ३०५ कुटुंबांना या सवलतीच्या अन्नधान्याचा लाभ दिला जात आहे. उर्वरित एक लाख ८९ हजार ९८५ कुटुंब या सवलतीच्या अन्नधान्यापासून वंचित होते. त्यापैकी या महिन्यापासून एक लाख २१ हजार २४९(एपीएल) कुटुंबांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. या कुटुंबाना प्रती किलो नऊ रूपये ६० पैसे दराने तांदूळ व गहू दिले जाणार आहे. यानुसार सुमारे नऊ हजार ३३० क्विटंल धान्य वितरीत करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अंजली भोसले यांनी लोकमतला दिली.

Web Title: Food security for the deprived families of the poorer families