Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई : भायखळा कारागृहातील 300 कैद्यांना विषबाधा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 12:52 IST

भायखळा कारागृहातील 50 पेक्षा अधिक कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे.

मुंबई - भायखळा कारागृहातील 300 कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यातील जवळपास 70 जणांची प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कारागृह अधिकारी राजवर्धन सिन्हा यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (20 जुलै)सकाळी नाश्त्यानंतर काही कैद्यांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागला. मात्र काही वेळानं कैद्यांची प्रकृती अधिक खालावत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कारागृह प्रशासनानं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या या सर्व कैद्यांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. दरम्यान, कैद्यांना देण्यात आलेल्या नाश्त्यामधील अन्नपदार्थांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.    

 

 

टॅग्स :तुरुंगमुंबईअन्नातून विषबाधा