Join us  

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांची बदली 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 4:10 PM

अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांची आज तातडीने बदली करण्यात आली आहे.

मुंबई  - अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांची आज तातडीने बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मदत व पुनर्वसन विभागातील सहसचिव ए बी उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उन्हाळे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार त्वरित स्वीकारावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाकडून अन्य काही अधिकाऱ्यांच्याही बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये लक्ष्मी नारायण मिश्रा, आयुक्त पशुसंवर्धन यांची बदली जिल्हाधिकारी रत्नागिरी या पदावर एस एस चव्हाण यांच्या जागी करण्यात आली आहे. तर पवनीत कौर, यांची बदली आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदावर करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग, नागपूरच्या संचालक डॉक्टर माधवी खोडे चवरे यांची नियुक्ती जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र सरकारबदली