तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई
By Admin | Updated: August 20, 2014 00:49 IST2014-08-20T00:49:19+5:302014-08-20T00:49:19+5:30
भाभा रुग्णालयातील इंजेक्शन बाधाप्रकरणी नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद शिंदे यांनी सांगितले.

तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई
मुंबई : भाभा रुग्णालयातील इंजेक्शन बाधाप्रकरणी नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद शिंदे यांनी सांगितले. इंजेक्शन देणारे डॉक्टर, नर्स आणि त्यामुळे त्रस झालेल्या महिला रुग्णांचे जबाब नोंदवून घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
ज्या इंजेक्शनमुळे भाभा रुग्णालयातील महिला रुग्णांना त्रस झाला त्या इंजेक्शनचा साठा ताब्यात घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनालयाच्या अधिका:यांनी इंजेक्शनचे नमुने घेतले आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले. राबिया शेख यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रसूतीसाठी माङो नाव कुल्र्याच्या भाभा रुग्णालयातच दाखल करण्यात आले आहे. शनिवारी मला ताप आला म्हणून मी रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी मला डिस्चार्ज मिळणार होता. सोमवारी रात्री औषध घेतल्यावर मला थंडी वाजू लागली आणि अंग दुखू लागले. यानंतर मला सायन रुग्णालयात आणले आहे. आता मला अंगदुखी नाही. माङया बाळावरही कोणाताही परिणाम झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचेही राबिया सांगितले.
तसेच दुसरी रुग्ण शबनम शेख म्हणाल्या की, मला आधी सर्दी, खोकला झाला, मग ताप आल्यामुळे मला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2 दिवस मी उपचार घेत होते. सोमवारी रात्री औषध दिल्यानंतर मला थंडी भरली. यानंतर मला सायन रुग्णालयात आणण्यात आले आहे. (प्रतिनिधी)