फॉगिंग मशिनचे डिझेल गाड्यांमध्ये

By Admin | Updated: December 20, 2014 01:24 IST2014-12-20T01:24:23+5:302014-12-20T01:24:23+5:30

डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा विळखा मुंबईला बसलेला असताना फवारणीसाठीच्या फॉगिंग मशिनमधील डिझेल गायब झाले

Fogging machine diesel cars | फॉगिंग मशिनचे डिझेल गाड्यांमध्ये

फॉगिंग मशिनचे डिझेल गाड्यांमध्ये

मनीषा म्हात्रे, मुंबई
डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा विळखा मुंबईला बसलेला असताना फवारणीसाठीच्या फॉगिंग मशिनमधील डिझेल गायब झाले. त्यातही पालिका प्रशासनाकडून येणारे डिझेल आधी पालिका अधिकाऱ्यांच्या गाड्यांमध्ये आणि त्यानंतर उरलेले डिझेल धूर फवारणीच्या मशिनमध्ये वापरले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी संबंधित वाहतूक अभियंत्याकडून याचा अहवाल मागितला आहे.
फक्त डिझेलच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे धूर फवारणी न होण्याची कारणे समोर येत होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत ‘लोकमत’ने गुरुवारी याबाबतचे वृत्त सर्वात आधी प्रसिद्ध केले आणि या विषयाला वाचा फोडली होती. याचे गांभीर्य लक्षात घेत आज प्रभाग समितीच्या बैठकीत हा मुद्दा गाजला. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा देत याचा खुलासा करण्याची मागणी केली. यातही गंभीर बाब म्हणजे येणारे डिझेल हे आधी पालिका अधिकाऱ्यांंच्या गाड्यांत, त्यानंतर कचऱ्याच्या गाड्यांत आणि उरलेले डिझेल धूर फवारणी मशिनमध्ये टाकले जात असल्याची माहिती या वेळी समोर आली. याप्रकरणी प्रभाग समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी तातडीने दखल घेत संबंधित वाहतूक अभियंत्याकडे मुंबईतील २४ वॉर्डचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे साऱ्यांचेच धाबे दणाणले आहे. पुढच्या बैठकीत अहवालावर विचारविनिमय करून कारवाई करण्यात येणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.

Web Title: Fogging machine diesel cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.