Join us

मुंबईत धुक्याचं साम्राज्य, मध्य रेल्वे उशिराने; रस्ते वाहतुकीवरही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 07:54 IST

मुंबईतला गारठा वाढला असून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळत आहे. आज सकाळी ठिकठिकाणी धुक्याचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय. धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेलाही पहायला मिळत आहे.

मुंबई - मुंबईतला गारठा वाढला असून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळत आहे. आज सकाळी ठिकठिकाणी धुक्याचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय. धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेलाही पहायला मिळत आहे. धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु असून अनेक गाड्या आसनगावजजळ ट्रॅकवरच उभ्या आहेत. मुंबईकडे येणा-या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. सकाळची वेळ असल्याने अनेकजण आपल्या कार्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी रेल्वे स्थानकांवर उभे आहेत. पण ट्रेन नसल्याने त्यांना उशीर होत आहे. वाशिंदमध्ये संतप्त प्रवाशांनी रेल रोको केल्याची माहितीही मिळत आहे. 

दरम्यान धुक्यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. बोरीवली - दहिसर लिंक रोडवर वाहतुक धीम्या गतीने सुरू आहे. धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.  

टॅग्स :मध्ये रेल्वेमुंबई