विकासकामांना महत्व न देणे भोवले
By Admin | Updated: October 20, 2014 03:58 IST2014-10-20T03:58:17+5:302014-10-20T03:58:17+5:30
चार दिवसाच्या प्रतिक्षेनंतर सकाळी सहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली

विकासकामांना महत्व न देणे भोवले
दिपक मोहिते, वसई
चार दिवसाच्या प्रतिक्षेनंतर सकाळी सहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत पश्चिम किनारपट्टीवरील या सहा मतदारसंघातील राजकीय चित्र स्पष्ट झाले.
१२८ डहाणू विधानसभा मतदारसंघात सन २००९ पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मार्क्स. कम्यु. नी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढले. आ. राजाराम ओझरे येथून विजयी झाले परंतु मतदारसंघातील विकासकामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी होती. यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षात बंडखोरी झाली व ओझरे यांच्या मुलाने अधिकृत उमेदवाराविरोधात दंड थोपटले त्यामुळे कम्युनिष्ठांना फटका बसला व भाजपाचे धनारे निवडुन आले. धनारे हे नवोदीत असतानाही त्यांना मतदारांनी बऱ्यापैकी साथ दिली. भाजपच्या ध्यानीमनी नसतानाही ही जागा मिळवली.