टपऱ्यांवरील कारवाईसाठी भरारी पथके

By Admin | Updated: February 22, 2015 01:13 IST2015-02-22T01:13:10+5:302015-02-22T01:13:10+5:30

टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक नेमणार असल्याची ग्वाही लोकमतला दिली़ महापालिकेच्या पी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी या टपऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश दिले

Flying Squad for action on the posters | टपऱ्यांवरील कारवाईसाठी भरारी पथके

टपऱ्यांवरील कारवाईसाठी भरारी पथके

मुंबई : व्यसनाला आळा घालण्यासाठी टीम लोकमतने शाळांजवळील पान टपऱ्यांचे वास्तव मांडल्यानंतर पालक व सरकार सुन्न झाले़ या भयाण सत्याची दखल घेत महापालिका शिक्षण समितीने या टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक नेमणार असल्याची ग्वाही लोकमतला दिली़ महापालिकेच्या पी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी या टपऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश दिले असून ते यासंदर्भात स्वत: लक्ष देणार आहेत़ पालकांनी या टपऱ्यांबाबत संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे़
व्यसनाचा राक्षस हद्दपार करण्यासाठी टीम लोकमतने शाळेजवळील पान टपऱ्यांमुळे होणारे दुष्परिणाम रिअ‍ॅलिटी चेकच्या माध्यमातून सर्वांसमोर आणले़ यातील घातक बाब म्हणजे विद्यार्थी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या टपऱ्यांवर मिळणाऱ्या सिगारेट, मावा, गुटखा अशा तंबाखूजन्य पदार्थांकडे आकर्षित होत आहेत. तसेच टपऱ्यांवर सिगारेट ओढणाऱ्ऱ्यांना बाजूला शाळकरी मुलगा उभा आहे याचे भान राहत नाही़ धूम्रपानामुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यालाही धोका होऊ शकतो़ तसेच पानाच्या टपऱ्यांजवळ पानाच्या व गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी घाणीचे साम्राज्य असते़ हेही शाळकरी मुलांच्या आरोग्याला धोकादायक आहे़
हा सर्व प्रकार शाळेच्या समोर होत असतानाही शाळा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे सर्रास कानाडोळा करत आहेत. पालक या टपऱ्यांकडे गांभीर्याने बघत नाही आणि सरकार तर कायदा करून गाढ झोपेतच जाते, ही सर्व बाब टीम लोकमतने या रिअ‍ॅलिटी चेकच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली़ (प्रतिनिधी)

च्हे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर पालकांनी शाळा व सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला़ अनेक पालकांनी लोकमत कार्यालयात फोन करून शाळेजवळील टपऱ्या व त्याचे दुष्परिणाम यांची जाणीव करून दिल्याबद्दल लोकमतचे आभार मानले. तर विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी स्वत:हून पुढाकार घेत टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले.

यापुढे असे प्रकार होणार नाहीत
कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यावर बंधन घालणे आवश्यकच आहे. ‘लोकमत’ने शाळांजवळ होणाऱ्या तंबाखू विक्रीचा पर्दाफाश केला. हा प्रकार धक्कादायक आहे. मी आपणास आश्वासन देतो की, हे प्रकार यापुढे होणार नाहीत़ याकडे मी स्वत: लक्ष देईन. ज्या ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत त्या ठिकाणी आम्ही भरारी पथके पाठवून धडक कारवाई करणार आहोत. आमच्या विभागाकडून तंबाखू आणि गुटखा विक्रीविरोधात कडक पावले उचलली जाणार आहेत. भरारी पथकांना आम्ही तत्काळ आदेश दिलेले आहेत. लवकरच या सर्व प्रकारांवर अंकुश लावण्यात येईल.
- विनोद शेलार, शिक्षण समिती अध्यक्ष

हलगर्जीपणाची दखल
महापालिका पी-उत्तर विभागाच्या अखत्यारीत होणारा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ही बातमी वाचताच लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना मी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पालिका अधिकाऱ्यांकडून याबाबत काही हलगर्जीपणा होतोय का याची पडताळणी मी स्वत: करत आहे.
- देवेंद्रकुमार जैन,
साहाय्यक आयुक्त, पी उत्तर विभाग

Web Title: Flying Squad for action on the posters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.