Join us  

वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फ्लोटिंग क्रूझ बुडाले, 15 जणांना वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 8:39 PM

वांद्रे वरळी सी लिंकवरील टोलनाक्याजवळ शुक्रवारी एका फ्टोटिंग क्रूझला जलसमाधी मिळाली. यावेळी बोटीवर असलेल्या 15 जणांना वाचवण्यात यश आले. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट नुकतेच सुरू करण्यात आले होते. आज दुपारच्या सुमारास या रेस्टॉरंटमध्ये समुद्राच्या लाटांचे पाणी शिरले.  सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

टॅग्स :मुंबईअपघात