‘उंदीर मामा’मुळे विमानाचे लँडिग

By Admin | Updated: December 31, 2015 04:26 IST2015-12-31T04:26:30+5:302015-12-31T04:26:30+5:30

मुंबई ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक उंदीर सापडल्याने ते तातडीने माघारी बोलावण्याची वेळ कंपनीवर आली. विमानात उंदीर असल्याची तक्रार प्रवाशाने केली होती.

Flight of the plane due to the mouse mama | ‘उंदीर मामा’मुळे विमानाचे लँडिग

‘उंदीर मामा’मुळे विमानाचे लँडिग

मुंबई : मुंबई ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक उंदीर सापडल्याने ते तातडीने माघारी बोलावण्याची वेळ कंपनीवर आली. विमानात उंदीर असल्याची तक्रार प्रवाशाने केली होती. एअर इंडियाचे विमान क्रमांक ‘एआय१३१’ हे मुंबईहून लंडनला निघाले होते. तेहरानजवळ ते गेल्यावर विमानात उंदीर असल्याचे समजताच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे विमान परत बोलवण्यात आले.
या विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवून हे फ्लाइट रद्द करण्यात आले. त्यांच्यासाठी एअर इंडियाने दुसऱ्या पर्यायी विमानाची सोय केली. याप्रकरणी, डीडीसीएने तातडीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title: Flight of the plane due to the mouse mama