Join us

बधाई हो ! महिलेनं हवेत दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 13:41 IST

एका महिलेनं आकाशात बाळाला जन्म दिल्याचे वृत्त समोर आले आहे. तुम्ही जे वाचलं ते खरंच आहे.

मुंबई - एका महिलेनं आकाशात बाळाला जन्म दिल्याचे वृत्त समोर आले आहे. तुम्ही जे वाचलं ते खरंच आहे. आता तुम्हाला वाटेल काय आहे हा नेमका चमत्कार?. तर चमत्कार वगैरे काही नाहीय. इंडोनेशियाकडे जाणाऱ्या विमानात प्रवासादरम्यान एका महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला. यानंतर या विमानाचं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी (24 ऑक्टोबर) सकाळी इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. 

अबुधाबीहून जकार्ताकडे प्रवास करणाऱ्या एतिहाद एअरवेजच्या विमानात या महिलेनं बाळाला जन्म दिला. यानंतर हे विमान मुंबईकडे वळवण्यात आले. मुंबई विमानतळावर लँडिंग केल्यानंतर नवजात बाळाला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला प्रवासादरम्यानच प्रसूती वेदना होऊ लागल्या होत्या. यानंतर विमानात केबिन क्रू आणि अन्य महिला प्रवासांच्या मदतीनं महिलेची डिलिव्हरी करण्यात आली. यादरम्यान, वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली.

...यानंतर करण्यात आलं लँडिंगएटीसीनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत विमान तात्काळ मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करण्याचे आदेश दिले. यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.  लँडिंगनंतर विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांनी महिला आणि नवजात बाळाला तातडीनं स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

 

टॅग्स :मुंबईनवजात अर्भक