स्वच्छता अभियान आचारसंहितेच्या फे:यात
By Admin | Updated: October 3, 2014 02:13 IST2014-10-03T02:13:54+5:302014-10-03T02:13:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’चा नारा देत 2 ऑक्टोबरनिमित्त सफाई अभियान राबवण्याचा निर्णय घेतला.

स्वच्छता अभियान आचारसंहितेच्या फे:यात
>मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’चा नारा देत 2 ऑक्टोबरनिमित्त सफाई अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर हे अभियान राबवण्यात आले. मात्र हे अभियान आचारसंहितेच्या फे:यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सरकारी विभागाकडून सरकारच्या कुठल्याही योजनेचे गुणगान गाऊ शकत नसतानाही मध्य रेल्वेकडून रेल्वे राज्यमंत्र्यांना बोलावून त्यास प्रसिद्धी देण्यात आली. तर पश्चिम रेल्वेकडून रेल्वे राज्यमंत्र्यांना प्रसिद्धी न देण्याचा निर्णय घेतला. हे पाहता मध्य रेल्वेसह रेल्वे राज्यमंत्री आचारसंहितेमुळे अडचणीत येऊ शकतात.
2 ऑक्टोबरच्या सफाई अभियानासाठी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकात रेल्वे राज्यमंत्र्यांनी उपस्थिती लावलेली असतानाही त्याला प्रसिद्धी न देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला.
मात्र असे असतानाही मध्य रेल्वेवरील सीएसटी स्थानकात रेल्वे राज्यमंत्री सिन्हा यांनी उपस्थिती लावतानाच त्याला प्रसिद्धी देण्याचे काम करण्यात आले. या वेळी सीएसटीच्या हार्बरवरील 1 नंबर फलाट आणि त्याबाहेर परिसराची पाहणी रेल्वे राज्यमंत्र्यांकडून करण्यात आली.
यानंतर उपस्थित प्रसारमाध्यमांशीही त्यांनी संवाद साधत या अभियानाला लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. आशावादी राहिल्यास हे अभियान यशस्वी होईल. ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याचेही ते म्हणाले. त्याचप्रमाणो रेल्वे अपघातांना आळा कसा घालता येईल आणि त्यासाठी काय केले पाहिजे असे विचारले असता, यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षेसाठी भरीव तरतूद केल्याची माहिती त्यांनी केल्याचे सांगितले.
तसेच हे 1क् किंवा 1क्क् दिवसांत होणारे काम नसून त्याला थोडा
वेळ लागेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुका होत असून राज्यात आचारसंहिता
लागू आहे. त्यामुळे सरकारच्या कुठल्याही योजनेला सरकारी विभागाकडून प्रसिद्धी दिली जाऊ शकत नसल्यानेच आम्ही प्रसिद्धी दिली नाही.
- गजानन महतपूरकर (पश्चिम रेल्वे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी)
‘परे’कडून नियमांचे पालन : रेल्वेमंत्र्यांनी साधलेला हा संवाद आणि रेल्वेकडून त्याला प्रसिद्धिमाध्यमांद्वारे देण्यात आलेली प्रसिद्धी पाहता आचारसंहितेच्या फे:यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुळात पश्चिम रेल्वेकडून कुठलीही प्रसिद्धी देण्यात आलेली नसतानाही मध्य रेल्वेकडून अशा प्रकारची प्रसिद्धी का देण्यात आली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिका:यांसह अन्य जनसंपर्क अधिका:यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.