Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नोटाबंदीवेळी हवाई दलाने 625 टन नव्या नोटा पोहोचविल्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 11:25 IST

'हवाई दलाने 33 मोहिमांद्वारे  625 टन नोटा विविध भागात पोहोचविल्या'

मुंबई : हवाई दलाने नोटाबंदीनंतर देशातील विविध भागात 625 टन नवीन नोटा पोहोचविण्याचे काम केल्याचे हवाई दलाचे माजी एअर मार्शल बी.एस.धनोवा यांनी सांगितले. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई येथे आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात बी.एस.धनोवा यांनी याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर, 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

बी.एस.धनोवा यांनी सांगितले की, 'ज्यावेळी नोटाबंदी झाली होती. त्यावेळी आपल्यापर्यंत नव्या नोटा पोहोचविण्याचे काम केले होते. जर 20 किलोग्रॅमच्या बॅगेत एक कोटी रुपये येतात, तर मी सांगू शकत नाही की किती कोटी रुपये आम्ही पोहोचविले.'  बी.एस.धनोवा यांच्या प्रेझेंटेशनच्या एका स्लाइडमध्ये असे दाखविण्यात आले की, नोटाबंदीच्या घोषणेनंतर देशाच्या सेवेसाठी हवाई दलाने 33 मोहिमांद्वारे  625 टन नोटा विविध भागात पोहोचविल्या. 

बी.एस.धनोवा हे 31 डिसेंबर 2016 पासून 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हवाई दलाचे प्रमुख होते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई येथील आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमावेळी बी.एस.धनोवा यांनी राफेल खरेदीवरील वाद-विवादावरही भाष्य केले. बोफोर्स व्यवहार हा सुद्धा वादात अडकला होता. बोफोर्स तोफ चांगली होती.  

टॅग्स :भारतीय हवाई दलनोटाबंदी