४०० चौरस फुटांची मिळणार सदनिका
By Admin | Updated: May 27, 2014 01:34 IST2014-05-27T01:34:31+5:302014-05-27T01:34:31+5:30
गांधीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना ११ वर्षांपासून रखडली आहे.

४०० चौरस फुटांची मिळणार सदनिका
नामदेव पाषाणकर, घोडबंदर - गांधीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना ११ वर्षांपासून रखडली आहे. विकासक आणि रहिवाशांमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी पाच गृहनिर्माण संस्थांनी स्वत:च ही योजना राबवायचे ठरविले आहे. यासंदर्भात पदाधिकारी, सदस्यांची नुकतीच बैठक पार पडली. या प्रस्तावाला मंजुरी घेण्यात आली आहे. सर्व्हे क्रमांक ५०७वर सुमारे दोन हजार १०० रहिवाशांसाठी पुनर्वसन योजना आखण्यात आली होती. आतापर्यंत चार विकासक बदलण्यात आले असून सध्या रिटझ् प्रॉपर्टीज व सायली इन्फोटेक हे जॉइंट व्हेंचर काम पाहत होते. प्रत्येक रहिवासी ४०० फुटांचे घर मिळावे यासाठी आग्रही राहिले आहेत. तसेच दुकानासाठीही जागेची मागणी पुढे येत असल्यामुळे घरे खाली होत नसल्याने विकास रखडला असल्याची माहिती ठाणे मनपाकडून मिळत आहे. विकासकाला येणार्या अडचणीमुळे प्रकल्प पूर्ण करणे अवघड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रविवारी गृहनिर्माण संस्थांनी बैठक बोलावली होती.