Join us

फ्लॅट भाड्याने देताय...! पोलिसांना कळवले का? ‘संशयास्पद हालचाली वाटल्यास त्वरित संपर्क करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 09:21 IST

मुंबईसारख्या शहरात भाडेकरू ठेवणे ही आता केवळ व्यवहाराची गोष्ट उरलेली नसून, ती आता कायद्याने सजग राहण्याची जबाबदारी बनली आहे.

मुंबई : मुंबईसारख्या शहरात भाडेकरू ठेवणे ही आता केवळ व्यवहाराची गोष्ट उरलेली नसून, ती आता कायद्याने सजग राहण्याची जबाबदारी बनली आहे. अनेकदा पोलिसांच्या कारवाईत समोर आलेल्या माहितीत जास्तीच्या पैशांसाठी घरमालक भाडेकरूच्या कागदपत्रांची पडताळणी न करताच भाडेकरू ठेवतात आणि त्याची माहिती पोलिसांना देत नाहीत. मुळात कुठेही संशयास्पद हालचाली वाटल्यास त्याबाबत तत्काळ माहिती द्या, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बांगलादेशींचे संकट

विशेषतः बांगलादेशी नागरिक भारतीय बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत वास्तव्यास असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. दलालांच्या मदतीने अगदी काहीसे रुपयांत आधार कार्ड, जन्म दाखले मिळवले जात असल्याचे समोर आले.

बाेगस कागदपत्रांचा वापर

दलाल मंडळी अवघ्या काही रुपयांत आधार कार्डसह बर्थ सर्टिफिकेट मिळवतात. त्यात, अनेक कारवायांमध्ये उत्तर प्रदेशातून बनावट जन्म दाखला मिळविण्याचे प्रमाणही वाढत आहे.

जन्म दाखल्याच्या आधारावर अन्य कागदपत्रे सहज उपलब्ध होत आहे. ही कागदपत्रे ओळखणार तरी कोण, असाही सवाल उपस्थित आहे. त्यासाठी ठोस नागरिकांची जबाबदारी वाढली

भाडेकरू ठेवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. फक्त आधार, पॅन कार्डावर विश्वास न ठेवता, भाडेकरूचा मूळ पत्ता, नागरिकत्व, रोजगाराची माहिती घेणे अनिवार्य आहे.

नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा

मुंबई पोलिसांच्या १३ जानेवारी २०२३ रोजीच्या आदेशानुसार, घर किंवा फ्लॅट भाड्याने देताना पोलिसांकडून एनओसी घेणे बंधनकारक नाही.

संबंधित माहिती ऑनलाइन पोर्टलवर किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात दिली जाणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी ऑनलाइन सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे.