फ्लॅश मॉबच्या तडक्याने आला ‘दालमिया’ उत्सव
By Admin | Updated: December 21, 2014 01:03 IST2014-12-21T01:03:42+5:302014-12-21T01:03:42+5:30
प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेजच्या यंगिस्तानने धमाकेदार ‘फ्लॅश मॉब’ सादर करून आपल्या आगामी ‘दालमिया उत्सव’ कॉलेज फेस्टच्या आगमनाची चाहूल दणक्यात दिली.

फ्लॅश मॉबच्या तडक्याने आला ‘दालमिया’ उत्सव
रोहित नाईक ल्ल मुंबई
नुकताच वांद्रे लिंक रोडवर सकाळी ८च्या सुमारास प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेजच्या यंगिस्तानने धमाकेदार ‘फ्लॅश मॉब’ सादर करून आपल्या आगामी ‘दालमिया उत्सव’ कॉलेज फेस्टच्या आगमनाची चाहूल दणक्यात दिली. त्याचवेळी कॉलेजियन्सनी मुंबईकरांना काश्मीरमधील पूरग्रस्तांना आपल्या परीने मदत करण्याचे आवाहनदेखील केले असून, या फेस्टमध्ये धमाल मस्तीबरोबरच सामाजिक कार्य करण्याचा निर्धारदेखील केला आहे. ६० हून अधिक युथचा समावेश असलेल्या या फ्लॅश मॉबची धुरा प्रा. सुभाषिनी नाईकर आणि प्रा. दीपाली कारिया व प्राचार्य डॉ. एन. एन. पाड्ये यांनी सांभाळली.
प्रतिष्ठित फेस्टिव्हलमध्ये गणल्या जाणाऱ्या ‘दालमिया उत्सव’ची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, या स्पर्धेची ट्रॉफी आपणच मारायची हीच एक चर्चा मुंबईतील कॉलेजकट्ट्यांवर रंगली आहे.
लिटररी आर्ट, फाइन आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, मॅनेजमेंट अॅण्ड फिल्म आर्ट, इनफॉर्मल्स आणि गेमिंग-स्पोटर््स अशा प्रमुख सहा गटांत ही स्पर्धा विभागली असून, एकूण ४६ स्पर्धांची चुरस या फेस्टमध्ये रंगणार आहे.
जस्ट-अ-मिनिट, डिबेट, क्वीझ, फिल्मी ज्ञान, टिष्ट्वस्ट-अ-टेल, क्रिएटिव्ह रायटिंग यासारख्या स्पर्धा लिटररी आर्ट गटात रंगतील.
परफॉर्मिंग आटर््समध्ये स्ट्रीट प्ले, सोलो सिंगिंग, ग्रुप डान्स, फॅशन शो, बिट बॉक्सिंग आणि बी. बॉइंग या रॉकिंग स्पर्धा होतील. त्याचबरोबर कॉमेडी ड्रामा, गिटार वॉर - डिजे वॉर या हटके स्पर्धांची रंगत देखील असेल. मॅनेजमेंट-फिल्म फेस्टसाठी स्पॉट फोटोग्राफी, शॉर्ट मूव्ही आणि अॅड स्पूफ या स्पर्धांव्यतिरिक्त फ्लिप बूक ही अनोखी स्पर्धा असेल. पोस्टर मेकिंग, टॅटू मेकिंग, सोप कार्विंग, मास्क मेकिंग, स्केच, ब्रशचा वापर न करता पेंटिंग आणि क्विलिंग या नेहमीच्या स्पर्धांचा समावेश फाइन आटर््स गटात आहे.
सगळ्यात हटके स्पर्धा आहेत त्या इनफॉर्मल्समध्ये. यामध्ये कॉलेज लीडर्सची स्पर्धा, राजनीती, शरीरसौष्ठव+टास्क, कबड्डी, अंताक्षरी, मि. अॅण्ड मिस उत्सव आणि टग आॅफ वॉर यांचा समावेश असेल. त्याचबरोबर दालमिया कॉलेजचा हातखंडा असलेल्या टे्रझर हंटचा थरार देखील या वेळी रंगेल. विविध इंटरकॉलेज टे्रझर हंट गाजवणाऱ्या टीम दालमियाने यंदाच्या ‘उत्सव’मध्येही ‘कडक’ अरेंजमेंट केली असून, या वेळी मजामस्ती आणि तितकाच थरार अनुभवायला मिळणार आहे. गेमिंग-स्पोटर््स विभागात फिफा, काउंटर स्ट्राइक, लगोरी, निआॅन क्रिकेट-फुटबॉल आणि एनएफएस या स्पर्धा रंगतील.