ऑर्केस्ट्रा बारमध्ये पाच चोरकप्पे

By Admin | Updated: November 29, 2014 00:29 IST2014-11-29T00:29:54+5:302014-11-29T00:29:54+5:30

सांताक्रूझच्या लव्हली ऑर्केस्ट्रा बारमध्ये समाजसेवा शाखेने घातलेल्या धाडीत बारबालांना दडविण्यासाठी बांधलेले तब्बल पाच चोरकप्पे आढळले.

Five thieves in the orchestra bar | ऑर्केस्ट्रा बारमध्ये पाच चोरकप्पे

ऑर्केस्ट्रा बारमध्ये पाच चोरकप्पे

मुंबई : सांताक्रूझच्या लव्हली ऑर्केस्ट्रा बारमध्ये समाजसेवा शाखेने घातलेल्या धाडीत बारबालांना दडविण्यासाठी बांधलेले तब्बल पाच चोरकप्पे आढळले. मात्र त्यात बारबाला सापडल्या नाहीत. धाड पडणार याची कुणकुण लागल्याने बारबाला चोरकप्प्यातून बारच्या बाहेर पडल्या असाव्यात, अशी शंका समाजसेवा शाखेला आहे.
गजधरबांध परिसरात हा बार आहे. ऑर्केस्ट्रासाठी चारच महिला सिंगर रात्री नऊर्पयत ठेवण्याची परवानगी या बारला आहे. मात्र बारमध्ये चारपेक्षा जास्त मुली असतात, नऊनंतर मध्यरात्रीर्पयत त्या बारमध्ये थांबतात, ईल चाळे करतात, अशी माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार काल रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक विलास दातीर, संजय साळुंखे, राजेंद्र रानमाळे आणि पथकाने या बारवर छापा घालून तपासणी सुरू केली. अधिकारी आत शिरले तेव्हा तेथे चार बारबाला आढळल्या. तेव्हा अधिका:यांनी संपूर्ण बारची तपासणी सुरू केली. त्यात बारबालांच्या चेंजिंग रूमधील तीन आरशांपैकी एक आरसा संशयास्पद आढळला. आरसा चाचपून पाहिला तेव्हा त्यामागे दरवाजा आढळला. विटांनी बांधलेला हा दरवाजा फोडताना अधिका:यांना तीन तास लागले. हा दरवाजा फोडला तेव्हा वीसेक चौरस फुटांचा चोरकप्पा आढळला. याच चेंजिंग रूममधील अन्य एका आरशामागे आणखी एक असा कप्पा अधिका:यांनी शोधून काढला. यानंतरच्या तपासणीत भिंतींमध्ये अत्यंत खुबीने तयार केलेले तीन चोरकप्पे सापडले.
कप्पे सापडले, मात्र त्यात बारबाला नव्हत्या. या प्रत्येक चोरकप्प्यातून बाहेर पडण्यासही मार्ग ठेवल्याने बारबाला त्यातून निसटल्याची शंका अधिकारी व्यक्त करतात. याशिवाय धाड पडणार किंवा पडली याची आगाऊ माहिती बारबालांना मिळाली असावी, असाही त्यांचा अंदाज आहे.
शाखेच्या अधिका:यांनी बार मॅनेजरविरोधात गुन्हा नोंदवून प्रकरण पुढील तपासासाठी सांताक्रूझ पोलिसांकडे वर्ग केले आहे. तसेच बार उभारणीसाठी इमारतीच्या मूळ ढाचात बदल केल्याने बारमालक, मॅनेजर आणि सर्व संबंधितांवर कारवाई करावी, असा प्रस्ताव समाजसेवा शाखेने महापालिकेकडे धाडल्याचे समजते.  (प्रतिनिधी) 

 

Web Title: Five thieves in the orchestra bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.