प्रचार साहित्यावर ‘पंचरंगी’ छाप!
By Admin | Updated: September 30, 2014 00:52 IST2014-09-30T00:52:16+5:302014-09-30T00:52:16+5:30
शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्यांनीच आता वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी-युती तुटल्यामुळे राज्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
प्रचार साहित्यावर ‘पंचरंगी’ छाप!
>स्नेहा मोरे - मुंबई
शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्यांनीच आता वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी-युती तुटल्यामुळे राज्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचार साहित्याची दुकाने गजबजू लागली आहेत. 19 ऑक्टोबरला सत्तेवर विराजमान होण्यासाठी ‘प्रचारबस्ता’ बांधण्याची लगबग या दुकानांमध्ये सध्या दिसत आहे.
गेल्या आठवडय़ातील राजकीय अस्थिरतेमुळे प्रचार साहित्य खरेदीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, युती आणि युतीपाठोपाठ आघाडीला सुरुंग लागल्यानंतर लगेचच प्रचार साहित्याच्या दुकानांमध्ये कार्यकत्र्यानी गर्दी करायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवारांनी प्रचार साहित्याची वाढीव मागणी करीत ऑर्डरही देऊन ठेवली आहे. शहर - उपनगरातील दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, नटराज मार्केट अशा मार्केट्समध्ये प्रचार साहित्याच्या खरेदीसाठी कार्यकत्र्याची झुंबड उडत आहे.
प्रचार साहित्यामध्ये उपरण्यापासून ङोंडय़ांर्पयत जवळपास 5क् वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य सध्या बाजारात उपलब्ध असल्याचे विक्रेते संजय शेट्टी यांनी सांगितले. उपरण्यामध्येही साधे उपरणो, शाही उपरणो असे प्रकार आहेत. राजकीय पक्षांचे फेटे, पुणोरी पगडय़ा, बिल्ले, प्रचार फेरीचे फलक, विविध पक्षांच्या विविधरंगी साडय़ा, टोप्या अशी विविधता यंदा प्रचार साहित्यामध्ये पाहायला मिळत आहे. प्रचार फेरीसाठी महिला कार्यकत्र्याकडून साडय़ा आणि त्यावर बिल्ले अशी एकत्र मागणी असते. शिवाय, भाजपा, शिवसेना, आरपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या अध्यक्षांची छायाचित्रे असलेले ङोंडे व फलकांना विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.
प्रचारयंत्रणोसाठी मुद्रणालये आणि ऑफसेट मुद्रणाच्या व्यवसायाला मोठय़ा प्रमाणात काम मिळाले आहे. उमेदवारांची पत्रके आणि इतरही प्रचार साहित्य मुद्रणाच्या कामासाठी अतिशय कमी वेळ असल्यामुळे मुद्रणालयातील कर्मचा:यांना आणि व्यावसायिकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. मुद्रण व्यवसायात कागद, शाई आणि इतर साहित्याच्या दरात 1क् टक्क्यांनी वाढ झाली आहे. निवडणुकीच्या काळात मुद्रण व्यवसायात 7क् ते 8क् कोटी रुपयांची उलाढल होत असल्याचे मुद्रण व्यावसायिकांनी सांगितले. प्रचारासाठी केवळ 14 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे घरोघरी पत्रके, हॅण्डबिले, मतदानाचे ओळखपत्र, बिल्ले पोहोचविणो गरजेचे आहे. लवकरात लवकर त्याची छपाई करण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते मुद्रणालय व्यावसायिकांच्या मागे लागले आहेत. कसेही करून आजच्या आज पत्रकाची छपाई करून देण्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा देण्यासाठी उमेदवार तयार आहेत. काही प्रमुख राजकीय पक्षांनी मात्र निवडणुकीची तारीख घोषित होताच मुद्रणालयाकडे कामे दिली असून, अनेक उमेदवारांच्या नावांची पत्रके तयार करण्याचे काम जवळपास पूर्णसुद्धा झाले आहे.
4गेल्या काही वर्षात गुजरातमध्ये उभ्या राहिलेल्या कापड गिरण्यांमध्ये भिवंडीपेक्षाही स्वस्तात कापड उपलब्ध होत आहे. यंदा मात्र निवडणूक प्रचार साहित्याच्या बाजारात गुजरातने उल्हासनगरवरही मात केली आहे.
4उल्हासनगरात प्रचार साहित्य तयार करण्यात जितका खर्च येतो, त्यापेक्षा कमी किमतीत गुजरातमध्ये हे साहित्य मिळते.
4प्रचारासाठी लागणारे साहित्य अहमदाबाद आणि सुरत येथे स्वस्तात मिळत असल्याने व्यापा:यांनी गुजरातकडे मोर्चा वळविला आहे.
4पूर्वी आम्ही उल्हासनगरहून साहित्य आणत असू; मात्र आता गुजरातला पहिली पसंती देत असल्याचे उदय बुधवानी या व्यापा:याने सांगितले.
मेड इन चायना
निवडणूक काळात चीननिर्मित प्रचार व प्रसार साहित्यही मोठय़ा प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. हे साहित्य टिकाऊ नसले, तरी स्वस्त आहे. या साहित्याला बाजारात काही प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेते सुरेंद्र शहा यांनी सांगितले.
प्रचार साहित्याचे दर
टोपी - 4 ते 5 रुपये
दुपट्टा, मफलर - 5 ते 12 रुपये
बिल्ला - 5 ते 3क् रुपये
मुखवटा - कागदी : 2 ते 5 रुपये
प्लॅस्टिक : 5 ते 1क् रुपये
रबरी : 15 ते 2क् रुपये
डोक्याच्या पट्टय़ा - 2 ते 5 रुपये
ङोंडे - छोटे : 3 ते 5 रुपये
मोठे : 2 बाय 3 फूट 35 रुपये
साडी - 1क्क् ते 15क् रुपये
टी-शर्ट - 6क् ते 8क् रुपये
सदरा - 6क् ते 1क्क् रुपये