भिवंडीत दहा शाळा अनधिकृत
By Admin | Updated: May 28, 2014 23:48 IST2014-05-28T21:49:44+5:302014-05-28T23:48:00+5:30
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रांत शासनाच्या परवानगीविना १० अनधिकृत शाळा सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी जी. व्ही. मैंदाडे यांनी जाहीर केली असून पालकांनी सदर शाळांमध्ये आपल्या पाल्यांना दाखल करू नये, असा इशारा दिला आहे.

भिवंडीत दहा शाळा अनधिकृत
भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रांत शासनाच्या परवानगीविना १० अनधिकृत शाळा सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी जी. व्ही. मैंदाडे यांनी जाहीर केली असून पालकांनी सदर शाळांमध्ये आपल्या पाल्यांना दाखल करू नये, असा इशारा दिला आहे.
सरस्वती इंग्रजी प्राथमिक शाळा, नवीवस्ती, हाजी मोहम्मद यासीन मटरून इंग्रजी प्राथमिक शाळा, न्यू गौरीपाडा, अल फुकरान इंग्रजी प्राथमिक शाळा, न्यू गौरीपाडा,अल फुकरान इंग्रजी प्राथमिक शाळा, गौरीपाडा,भंडारी राजेशाम इंग्रजी प्राथमिक शाळा, न्यू गौरीपाडा, लिओ किड्स इंग्रजी प्राथमिक शाळा, धामणकरनाका, विझडम ॲकेडमी वेल्फेअर सोसायटी, गुलझारनगर, झायन इंग्रजी प्राथमिक शाळा, नवीवस्ती,आसमा उर्दू प्राथमिक शाळा, धामणकरनाका, दस्तगीर उर्दू प्राथमिक शाळा, टावरे कम्पाउंड अशी दहा अनधिकृत शाळांची यादी पालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकार्यांनी जाहीर केली आहे. या शाळांना शासनाची परवानगी नसल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद केले आहे. तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय चालू शैक्षणिक वर्ष २०१४-१५मध्ये शाळा अनधिकृतपणे चालू ठेवल्यास बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याच्या हक्क अधिनियमानुसार सदर संस्था फौजदारी गुन्ास पात्र ठरतील, असा इशाराही दिला आहे. या घटनेने शहरांतील पालकवर्गात खळबळ माजली असून संस्थाचालक अडचणीत आले आहेत. (प्रतिनिधी)