पाच पोलीस अधिकारी गजाआड

By Admin | Updated: May 30, 2015 01:57 IST2015-05-30T01:57:54+5:302015-05-30T01:57:54+5:30

महिलाड्रग माफीया आणि एमडी या अत्यंत घात अमलीपदार्थाची नशा मुंबईला चढवणारी शशिकला उर्फ बेबी पाटणकरला सर्वतोपरी मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आज पाच पोलिसांना गजाआड केले.

Five police officers go to jail | पाच पोलीस अधिकारी गजाआड

पाच पोलीस अधिकारी गजाआड

मुंबई : महिलाड्रग माफीया आणि एमडी या अत्यंत घात अमलीपदार्थाची नशा मुंबईला चढवणारी शशिकला उर्फ बेबी पाटणकरला सर्वतोपरी मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आज पाच पोलिसांना गजाआड केले. यात अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनीटचे वरिष्ठ निरिक्षक सुहास गोखले, निलंबीत पोलीस निरिक्षक गौतम गायकवाड यांचा सहभाग आहे. या सर्वांना उद्या न्यायालयात हजर केले जाईल.
गोखले, गायकवाड यांच्यासोबत फौजदार सुधाकर सारंग, सहाय्यक फौजदार ज्योतीराम माने आणि पोलीस शिपाई यशवंत पार्टे यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.
सातारा पोलिसांनी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या धर्मराज काळोखे या शिपायाला पुण्यातील खंडाळा गावातून अटक केली होती. त्याच्या घरातून सुमारे ११० किलो एमडीचा साठा हस्तगत करण्यात आला होता. त्याच्या चौकशीतून बेबीचे नाव पुढे आले. दुसरीकडे मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यातील काळोखेच्या कपाटातून आणखी एमडी सापडले. सातारा व मुंबई पोलीस बेबीच्या मागावर होते. तांत्रिक तपासात गायकवाड, पार्टेसह आणखी काही पोलीस अधिकारी-कर्मचारी बेबीच्या सतत संपर्कात होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्यामुळे बेबीच्या संपर्कात असलेल्या सर्वच पोलिसांची चौकशी गुन्हे शाखेने केली होती. गोखले यांनी एमडीड्रग विकणाऱ्या तस्करांविरोधात मोहिम उघडली होती. मात्र त्यांनी केलेल्या प्रत्येक कारवाईची झाडाझडती गुन्हे शाखा घेणार आहे. बेबीला सुरक्षित करण्यासाठी, बेबीचा धंदा वाढण्यासाठी गोखले यांनी तिचे स्पर्धक कारवाईच्या नावाखाली नामशेष केले, असा संशय गुन्हे शाखेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Five police officers go to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.