भिवंडीत आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू
By Admin | Updated: December 27, 2014 14:17 IST2014-12-27T09:05:25+5:302014-12-27T14:17:01+5:30
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील माणकोली परिसरात लाकडाच्या भंगाराला लागलेल्या भीषण आगीत होरळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

भिवंडीत आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. २७ - ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील माणकोली परिसरात लाकडाच्या भंगाराला लागलेल्या भीषण आगीत होरळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या आगीत सात जण जखमी झाले असून त्यांच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
माणकोलीतील स्वरुप कम्पाऊंड येथे लाकडाच्या भंगाराचे दुकान आहे. शनिवारी पहाटे या भंगाराच्या दुकानामध्ये आग लागली, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.