Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील वर्सोवा येथे समुद्रात चार जण बुडाले, तिघांना वाचवले, एक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 19:38 IST

मुंबईतील वर्सोवा येथील समुद्रात चार जण बुडाले असून, त्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले आहे.

मुंबई -  मुंबईतील वर्सोवा येथील समुद्रात चार जण बुडाले असून, त्यापैकी चौघांना वाचविण्यात यश आले आहे. त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एक जण बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.  

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडे तीनच्या सुमारास वर्सोवा जेट्टीलगतच्या समुद्र किनाऱ्यावर आयुष खंडू रईदर, हर्ष अमोल कोळी, रिहान अब्बास अन्सारी , वैभव राकेश गौड ही मुले पोहत होती. या दरम्यान, हे चौघेही समुद्रात बुडू लागले. त्यावेळी तेथील स्थानिक रहिवाशांनी तिघा जणांना वाचवले. तर  वैभव गौड हा अद्यापपर्यंत सापडू शकलेला नाही. अग्निशमन दल आणि सागरी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :मुंबईबातम्या