Join us  

बेस्टच्या ताफ्यात २५ मिनी बस दाखल; मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 1:24 AM

आर्थिक तोट्यातून प्रशासनाला बाहेर काढण्यासाठी बसची खरेदी

मुंबई : बेस्ट उपक्रमाने तिकिटांच्या दरात मोठी कपात केल्यानंतर प्रवासी संख्या लाखोंनी वाढली. वयोमर्यादा अनुसार बसगाड्या भंगारात काढण्याचे प्रमाण अधिक असल्याने बस फेऱ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे मिनी बस सेवा वाढविण्यावर बेस्ट प्रशासनाने आता भर दिला आहे. नुकत्याच २५ मिनी वातानुकूलित बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या बसगाड्यांचे लोकार्पण वडाळा बस आगारात गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे, बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राजेंद्र मदने आदी उपस्थित होते. भाडे कपात केल्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. बेस्टच्या बसगाड्यांमधून दररोज ३२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या सोयीसाठी ५०० मिनी आणि ५०० मिडी बसगाड्या घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने गेल्या वर्षी घेतला.याबाबतच्या प्रस्तावाला विधानसभा निवडणुकीपूर्वी हिरवा कंदील देण्यात आला. बसचा ताफा सात हजारपर्यंत वाढविण्याचा निर्धार बेस्ट प्रशासनाने केला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३१०० बसगाड्या आहेत. भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या पहिल्या ५५ बसगाड्यांपैकी २५ ओशिवरा, पाच कुलाबा आणि २५ वडाळा बस आगारात आहेत. या वातानुकूलित बसगाड्या लवकरच वडाळा ब्रिज, बरकत अली दर्गा या मार्गांवर धावणार आहेत.या बस मार्गांवरनवीन वातानुकूलित बस मार्ग- ए-११०वडाळा रेल्वे स्थानक ते विद्यालंकार-संगमनगरमधील बसथांबा - वडाळा ब्रिज, बरकत अली दर्गा.पहिली बस : ६.१५ शेवटची बस : २४.००नवीन वातानुकूलित बस मार्ग ए-१७४वडाळा रेल्वे स्थानक ते भरणी नाकामधील बसथांबा - वडाळा ब्रिज, बरकत अली दर्गापहिली बस : ६.१५ शेवटची बस : २४.००

टॅग्स :बेस्ट