Join us
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या बदल्यात दिली पाच लाखांची आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 06:14 IST

अनैतिक संबंधातील प्रेमासाठी तिने पतीच्या बदल्यात पत्नीला ५ लाखांची आॅफर केली. ‘जुदाई ’ या हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे रंगलेल्या घटनेत पत्नीने मात्र पैसे नाकारले.

मुंबई : अनैतिक संबंधातील प्रेमासाठी तिने पतीच्या बदल्यात पत्नीला ५ लाखांची आॅफर केली. ‘जुदाई ’ या हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे रंगलेल्या घटनेत पत्नीने मात्र पैसे नाकारले. त्यामुळे पतीनेच तिच्या हत्येचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका करत, पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी पती सुधीर दरेकर (४५) याला बेड्या ठोकल्या आहेत.परळ परिसरात दरेकर हा पत्नी आणि मुलांसोबत राहतो. तो पालिकेत नोकरीला आहे. १२ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले. काही वर्षांपूर्वीच त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. याबाबत पाच वर्षांपूर्वी पत्नीला समजले. तिने त्याला विरोध केला.अशात प्रेयसीच्या घरी लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, तिचे सुधीरवर प्रेम असल्याने तिने अन्य कुणासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि सुधीरकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, याला सुधीरच्या पत्नीचा विरोध होता. अखेर सर्व मार्ग संपल्याने प्रेयसीने जुदाई चित्रपटाप्रमाणे पत्नीला पैसे देऊन सुधीरला विकत घेण्याचे ठरविले.सुधीरलाही ते पटले. तिने पत्नीला सुधीरच्या बदल्यात ५ लाख रुपयांची आॅफर दिली. १३ जूनच्या रात्री सुधीर याबाबत पत्नीला समजावत असताना, तिने व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. हीबाब सुधीरच्या नजरेत पडताच त्याने तिला मारहाण सुरू केली. तिचे उशीने तोंड दाबले. अखेर तो हत्यार शोधण्यासाठी आत गेला असताना, पत्नीने तेथून पळ काढला आणि थेट भोईवाडा पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली.

टॅग्स :पैसा