Join us

नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 22:49 IST

आग्रीपाडा पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई: नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सध्या पोलिसांकडून बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेचा शोध सुरू आहे.नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सातमधून एका अनोळखी महिलेने बाळ चोरलं. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. आरोपी महिलेचं वय साधारणत: 40 वर्ष असून ती 5 दिवसांच्या मुलाला घेऊन रुग्णालयातून पळून गेली. या प्रकरणी बाळाची आई शीतल साळवी यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :हॉस्पिटल