पनवेलकरांनी गिरवले फिटनेसचे धडे

By Admin | Updated: December 1, 2014 22:46 IST2014-12-01T22:46:36+5:302014-12-01T22:46:36+5:30

कुठल्याही शहाण्या माणसाने कधीही वजन काट्यावर उभे राहू नये, कारण जोपर्यंत ग्रॅव्हिटी आहे तोपर्यंत आपले वजन हे राहणारच.

Fitness lessons by Panvelkar | पनवेलकरांनी गिरवले फिटनेसचे धडे

पनवेलकरांनी गिरवले फिटनेसचे धडे

पनवेल : कुठल्याही शहाण्या माणसाने कधीही वजन काट्यावर उभे राहू नये, कारण जोपर्यंत ग्रॅव्हिटी आहे तोपर्यंत आपले वजन हे राहणारच. आपल्या पायांना आपल्या शरीराचे वजन झेपेनासे झाले की समजा आपल्याला वजन कमी करण्याची गरज आहे. वजन काटा हा केवळ रद्दी मोजण्यासाठीच असतो, असे धाडसी वक्तव्य करून सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी पनवेलकरांशी मनमोकळा संवाद साधून उपस्थितांची मने जिंकली. लोकमत माध्यम प्रायोजक असलेल्या सिटीजन युनिटी फोरम (कफ) आयोजित पनवेल संवादमालेचे पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो श्रोत्यांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमात ऋजुता दिवेकर यांच्या डोंण्ड लुज आऊट वर्क आऊट या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर असलेल्या ‘व्यायामाशी मैत्री आरोग्याशी खात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन नेत्रतज्ज्ञ सुहास हळदिपूरकर, लोकमत कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे भाषांतर ऋजुता दिवेकर यांच्या आई प्राध्यापिका रेखा दिवेकर यांनी केले आहे. त्यादेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
निवेदिका अनुपमा ताकमोघे यांनी ऋजुता दिवेकर यांच्याशी फिटनेसबाबत संवाद साधला. दिवेकर म्हणाल्या, पारंपरिक खाद्य लुप्त होत असून लोकांना नवीन फिटनेस मंत्राचे वेड लागले आहे. आपली उंची इतकी आहे तर वजन देखील इतके हवे हा वेडेपणा चालला आहे. त्यामुळे आपण आपली आहार संस्कृती विसरत चाललो आहोत. साजूक तूप खाल्ल्याने वजन वाढते हा गैरसमज आहे. उलट बारीक व्हायचे असेल तर खूप जास्त तूप खाल्ले पाहिजे, असा सल्ला दिवेकर यांनी उपस्थितांना दिला.
आहारात फॅट आणि साखर जेवणात गरजेचे आहेत. फक्त कोणत्याही गोष्टी प्रमाणात खाणे गरजेचे आहे. उलट फॅट न खाल्ल्यामुळे लोकांचे वजन वाढत असल्याचा कानमंत्र दिवेकर यांनी श्रोत्यांना दिला आहे.

Web Title: Fitness lessons by Panvelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.