पालघरमध्ये मासळी प्रचंड कडाडली

By Admin | Updated: September 16, 2014 22:49 IST2014-09-16T22:49:32+5:302014-09-16T22:49:32+5:30

समुद्रात मासेमारीला गेलेल्या मच्छीमारी नौका वादळी वारे व मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडल्याने मागील 10-15 दिवसापासून पालघर-डहाणू भागातुन मच्छीची आवक घटली आहे.

Fishery in Palghar is huge | पालघरमध्ये मासळी प्रचंड कडाडली

पालघरमध्ये मासळी प्रचंड कडाडली

हितेन नाईक ल्ल पालघर
राज्यशासनाच्या आदेशानुसार 15 ऑगस्ट नंतर  समुद्रात मासेमारीला गेलेल्या मच्छीमारी नौका वादळी वारे व मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडल्याने मागील 10-15 दिवसापासून पालघर-डहाणू भागातुन मच्छीची आवक घटली आहे. परिणामी उपलब्ध माशांच्या दरानी उचल खाल्याने बाजारातील माशांचे भाव कडाडले आहेत.
पावसाळी बंदीच्या 92 दिवसानंतर 15 ऑगस्ट रोजी मासेमारीला सुरूवात झाली. पहिल्या ट्रीपला चांगले मासे मिळाल्याने मच्छीमारामधून समाधान व्यक्त केले जात असतानाच आदिवासी खलाशी कामगार गौरी गणपतीच्या सुट्टीवर आपल्या घराकडे रवाना झाले. त्यामुळे 1क् ते 12 दिवस संपूर्ण मच्छीमारी व्यवसाय ठप्प पडला होता. त्यानंतर मासेमारीला सुरूवात झाल्यानंतर समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान खात्याच्या इशा:यानंतर सर्व मच्छीमारी नौका पुन्हा रिकाम्या हातानी परत आल्या होत्या. 
त्यामुळे पालघर जिल्हयातील वडराई, टेंभी, दांडी इ. भागासह डहाणू तालुक्यातून थोडेफार बोंबील, करंदी इ. मासे मिळत होते. परंतु पापलेट, दाढा, घोळ, रावस, सुरमईची मासेमारी करणा:या नौका किना:यावर अडकून पडल्याने मागील 7-8 दिवसापासून सातपाटी, पालघर, बोईसर, मनोर इ. भागातील बाजारपेठेत मासेच उपलब्ध होत नाहीत. 8क्क् ते 1क्क्क् रू. ला मिळणारी पापलेटची जोडी आज 14क्क् ते 15क्क् रू. दाढा 16 हजार रू. किलो, सुरमई 6क्क् ते 7क्क् रू. किलो, वाम 8क्क् रू. किलो, घोळ 7क्क् ते 8क्क् रू. , बोंबील 1क्क् रू. चे 5 नग, कोळंबी 5क्क् ते 7क्क् रू. किलो, अशा चढय़ा भावाने सध्या माशांची विक्री सुरू आहे. सातपाटीमधील प्रसिद्ध पापलेटची मासेमारीच ठप्प पडल्याने मुंबईच्या बाजारात येणारा हावडा (कलकत्ता) इ. भागातील पापलेट, दाढा इ. मासे सध्या बाजारात विक्रीला उपलब्ध होत आहेत. (वार्ताहर)
 
8क्क् ते 1क्क्क् रू. ला मिळणारी पापलेटची जोडी आज 14क्क् ते 15क्क् रू. दाढा 16 हजार रू. किलो, सुरमई 6क्क् ते 7क्क् रू. किलो, वाम 8क्क् रू. किलो, घोळ 7क्क् ते 8क्क् रू. , बोंबील 1क्क् रू. चे 5 नग, कोळंबी 5क्क् ते 7क्क् रू. किलो, अशा चढय़ा भावाने सध्या मच्छीची विक्री सुरू आहे. 
 
सर्वसमस्यावर मात करीत आमचे मच्छीमार पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात गेल्यानंतर येत्या काही दिवसात मासे पुन्हा बाजारात उपलब्ध होवून  भाव उतरतील असा विश्वास आहे.
- विश्वास पाटील,  
संचालक , 
          सर्वोदय मच्छीमार संस्था

 

Web Title: Fishery in Palghar is huge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.