१५ आॅगस्टपासून मासेमारी सुरू
By Admin | Updated: August 10, 2014 23:32 IST2014-08-10T23:32:27+5:302014-08-10T23:32:27+5:30
नारळी पौर्णिमेपासून समुद्रात मासेमारीला जाण्याबाबत पालघर व ठाणे जिल्ह्यातील मच्छीमारांमध्ये अहमहमिका लागली

१५ आॅगस्टपासून मासेमारी सुरू
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे रविवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याऐवजी दारू दुकानांना परवानगी मिळावी, याच विषयावर चर्चा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्य व महसूल योजना अंमलबजावणीबाबत खास ग्रामसभा घेण्याचे आदेश शासनाने ग्रामपंचायतींना दिले होते. त्यानुसार घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ७ बिअरबार व २ देशी दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
सरपंच अशोक कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली व जि. प. सदस्य रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत गेल्या ३ आठवड्यांपासून कामेरी गावाला एक दिवसआड पाणी पुरवठा होत असल्याने याबाबत चर्चा होईल, असे वाटले होते; मात्र तो विषय बाजूलाच राहिला. तसेच गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभेत भारत निर्माण पाणी योजना सुरू करणे व अतिक्रमणे काढणे या नेहमीच्या विषयांनाही बगल मिळाली. ग्रामसभेतून केवळ ठराव केले जातात, ते फक्त कागदावरच राहतात, असा प्रत्यय आलेल्या ग्रामस्थांनी या ग्रामसभेकडे पाठ फिरवली होती.
दारू दुकानाचे परवाने देण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी कोरम पूर्ण करण्याची धडपडही करावी लागल्याची चर्चा आहे. या ग्रामसभेत आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी करणे, महसुलीसाठी कार्यक्षमपणे अंमलबजावणी करणे, हे ठराव मंजूर करण्यात आले. दारू दुकानांच्या परवानगीसाठी ९ अर्ज आले होते. ते सर्व मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता १४ आॅगस्ट रोजी होणाऱ्या महिला ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महिला ग्रामसभेत आज झालेल्या दारूच्या ठरावाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.यावेळी झालेल्या चर्चेत उपसरपंच अनिल पाटील, ग्रा. पं. सदस्य मनोज पाटील, रणजित पाटील, भगवान पाटील, रवींद्र पाटील, शहाजी पाटील यांनी सहभाग घेतला. ग्रामसेवक बादशहा नदाफ यांनी अहवालवाचन केले. (वार्ताहर)