मत्स्यवैभव पुन्हा अनुभवता येणार
By Admin | Updated: March 4, 2015 01:20 IST2015-03-04T01:20:25+5:302015-03-04T01:20:25+5:30
गेल्या अडीच वर्षांपासून बच्चेकंपनीसह सर्व आतुरतेने वाट पाहत असलेले, मुंबईची शान असलेले ‘तारापोरवाला मत्स्यालय’ आज पुन्हा सुरू झाले.

मत्स्यवैभव पुन्हा अनुभवता येणार
मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून बच्चेकंपनीसह सर्व आतुरतेने वाट पाहत असलेले, मुंबईची शान असलेले ‘तारापोरवाला मत्स्यालय’ आज पुन्हा सुरू झाले. देशविदेशातील तब्बल ४०० माशांच्या प्रजातींसह अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या वातानुकूलित मत्स्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देशातील पहिल्या भुयारी मत्स्यालय (मरिन टनेल) पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. नूतनीकरणानंतर मत्स्यालयाच्या तिकिटातही वाढ झाली आहे.
सिंगापूर, दुबई, चीनच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या मत्स्यालयामुळे सागरी जीवन जवळून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. आता देशी माशांंसह विदेशातील समुद्री घोडा, स्विरल, पफर, सी कुकम्बर, सी अर्चिन, टॅँग, कॅटफिश, दगडी मासा, कोंबडा मासा, बॅट फिश, जायंट गोरामी, व्हिम्पल, किळीस मासा, शार्क, पिऱ्हाना, स्टार मासा, कासव, सागरी प्रवाळ, समुद्र फूल, रास फिश, बटरफ्लाय अशा चारशे प्रजाती आहेत. (प्रतिनिधी)
प्रवेश दर -
च्३ ते १२ वर्षांपर्यंत मुले - ३० रुपये
च्१२ वर्षांवरील प्रौढ - ६० रुपये
च्सैनिक आणि प्रशासकीय सेवानिवृत्त - ४० रुपये
च्शैक्षणिक संस्था (सवलतीचा दर) - ३० रुपये
च्विदेशी पर्यटक प्रौढ - २०० रुपये
च्विदेशी पर्यटक (वय ३ ते १२ वर्षे) - १०० रुपये
च्अपंग व्यक्ती - ३० रुपये
विशेष आकर्षणे -
च्टच पूल : मत्स्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यटकांना टॅँकमधील माशांना हात लावता येणार आहे.
च्प्रवेशद्वाराजवळ ओशनेरियमसारखा पाण्याचा टॅँक उभा करण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांना समुद्रात चालत असल्याचा अनुभव येतो.
च्जुन्या साध्या काचांऐवजी ११० एमएम जाडीच्या पारदर्शक काचा बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मासे जवळून पाहण्याचा अनुभव मिळतो.
च्माशांच्या जीवसृष्टीच्या अभ्यासासाठी अॅम्पिथिएटर साकारण्यात आले आहे.