मासळी लिलावगृहाचे दीड कोटी परत जाणार
By Admin | Updated: April 26, 2015 23:06 IST2015-04-26T23:06:35+5:302015-04-26T23:06:35+5:30
सातपाटी येथे दीड कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या मासळी लिलावगृहाच्या बांधकामास काही नागरिकांनी विरोध केल्याने बांधकाम ठप्प आहे.

मासळी लिलावगृहाचे दीड कोटी परत जाणार
हितेन नाईक, पालघर
सातपाटी येथे दीड कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या मासळी लिलावगृहाच्या बांधकामास काही नागरिकांनी विरोध केल्याने बांधकाम ठप्प आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून आता निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.
सातपाटी गावामध्ये ३५० ते ४०० मच्छिमारी नौका आहे. त्यावर डिझेल, बर्फ, जाळी आदी साहित्य तसेच मासे बाजारपेठेत नेण्यासाठी चिखलातून जावे लागते. येथे सुविधा उपलब्ध करण्यासाठी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी केंद्रशासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. यात ८०० मीटर जेट्टीसाठी पाच कोटी, मासळी लिलावगृहाला दीड कोटी, नौका रिपेरिंग यार्ड आणि जाळी विणण्याचे शेड उभारण्यासाठी प्रत्येकी ५० लाख खर्च प्रस्तावित होता.
सन २०१२ पासून जेट्टी उभारणीचे तसेच मासळी लिलावगृहाच्या बांधकामासाठी भराव व इतर काम सुरु करण्यात आले. यासंदर्भात काही सूचना नागरिकांकडून आल्यानंतर ग्रामपंचायतीने एका सभेचे आयोजन केले होते. त्यानंतर राज्यमंत्री गावित, सरपंच विद्या माळी, सुभाष तामोरे, आर. एस. पाटील, अनंत म्हात्रे, मयुर म्हात्रे, मयुरा म्हात्रे, चंदर अधिकारी निजाई आदींनी जागेची पहाणी केली. यावेळी पावसाचे व गटारीचे पाणी जाण्यासाठी व्यवस्थित पाइपलाइनची उभारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु
काही नागरिकांनी पाइपलाईन टाकण्यास विरोध केल्याने काम बंद आहे.