Join us  

जूनच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालये सुरू होणार, विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 4:10 AM

महाविद्यालयांचे २०१९-२० शैक्षणिक वर्ष ६ जूनपासून सुरू होणार आहे. दरवर्षीपेक्षा १२ दिवस आधीच हे शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचा निर्णय नुकताच विद्वत परिषदेच्या बैठकीत झाला.

मुंबई : महाविद्यालयांचे २०१९-२० शैक्षणिक वर्ष ६ जूनपासून सुरू होणार आहे. दरवर्षीपेक्षा १२ दिवस आधीच हे शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचा निर्णय नुकताच विद्वत परिषदेच्या बैठकीत झाला. या निर्णयामुळे सुट्टीचा कालावधी कमी झाल्याने प्राध्यापकांत नाराजीचे वातावरण आहे.शैक्षणिक वेळापत्रक जाहीर होत असले, तरी त्याचे पालन करण्यात कॉलेजांना अडचणी येत होत्या. मात्र, आता हा त्रास होणार नसून, सर्वसमावेशक विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राध्यापकांच्या मागणीनुसार सत्रांची सुरुवात २४ जूनपासून सुरू होणार होते. मात्र, महाविद्यालये दरवर्षीपेक्षा लवकर सुरू होणार असल्याचे जाहीर होताच, प्राध्यापकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विद्वत परिषदेच्या निर्णयानुसार नव्या वेळापत्रकनुसार प्रत्येक सत्राला ९० शैक्षणिक दिवस मिळणार आहेत. या वेळापत्रकाप्रमाणे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे पहिले सत्र ६ जून ते २४ आॅक्टोबर असणार आहे. या सत्रात १०८ शैक्षणिक दिवस असतील. यातील ९० दिवस शिकविण्याचे तर उर्वरित १८ दिवस हे परीक्षांसाठी असतील. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार विद्यापीठाने यंदाच्या वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे. दुसरे सत्र १३० दिवसांचे असून ते १५ नोव्हेंबर ते २ मेपर्यंत असणार आहे. पहिल्या सत्रात सणांचा कालावधी असल्यामुळे कमी शैक्षणिक दिवस मिळत असल्याचे विद्वत परिषदेतील सदस्यांनी सांगितले.सुट्ट्यांचा कालावधीगणपती सुट्टी २ ते ७ सप्टेंबरदिवाळी सुट्टी २५ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबरख्रिसमस सुट्टी २६ डिसेंबर ते १ जानेवारीउन्हाळी सुट्टी ३ मे ते ७ जूनसत्र कालावधीपहिले सत्र ६ जून ते २४ आॅक्टोबरदुसरे सत्र १५ नोव्हेंबर ते २ मे

टॅग्स :शिक्षण