Join us

मेट्रो-४ मार्गिकेवर पहिल्यांदाच यू-गर्डरचे यशस्वीरीत्या काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 01:03 IST

मुलुंड येथे कामगार हॉस्पिटलजवळ प्रथमत: यू-गर्डर टाकण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण

मुंबई : वडाळा-घाटकोपर-ठाणे-मुलुंड- कासारवडवली या मेट्रो-४ या उन्नत मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) करण्यात येत आहे. या मार्गिकेवर मुलुंड येथे कामगार हॉस्पिटलजवळ प्रथमत: यू-गर्डर टाकण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. हे काम मंगळवारच्या पहाटे करण्यात आले आहे.वडाळा-घाटकोपर-ठाणे-मुलुंड-कासारवडवली अशी ही मेट्रो-४ मार्गिका संपूर्णत: उन्नत मार्गे बांधण्यात येणार आहे. ३२.३२ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेसाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेवर एकूण ३२ स्थानके बांधण्यात येणार आहे. दरदिवशी वडाळा - घाटकोपर - ठाणे -कासारवडवली या मार्गावर २०२१ रोजीपर्यंत ८ लाख ७० हजार प्रवासी तर २०३१ रोजीपर्यंत १२ लाख १० हजार प्रवासी प्रवास करतील. या मार्गिकेच्या विकासकामांसाठीच्या खरेदी आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो-४ मार्गिकांशी संबंधित कामे वेगाने सुरू आहेत. रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, ट्रेन कंट्रोल आदीबाबतच्या कामांचे करार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २० डिसेंबर, २०१९ रोजी रोलिंग स्टॉकची निविदा काढण्यात आली आहे.

टॅग्स :मेट्रो