Join us  

इतिहासात पहिल्यांदाच ‘आवाजा’ विना विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 4:26 PM

विसर्जन ध्वनी प्रदूषण टाळत शांततेत पार

मुंबई : यंदा पहिल्यांदाचा दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करताना वाद्यवृदांचा वापर झालेला नाही. त्यामुळे यंदाचे दीड दिवसांचे गणेश विसर्जन ध्वनी प्रदूषण टाळत शांततेत पार पडले आहे. कोरोनामुळे का होईना मुंबईकरांनी जगासमोर या निमित्ताने एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

आवाज फाऊंडेशनने दीड दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी ठिकठिकाणी आवाजाची नोंद घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी वाद्यवृंदाचा वापर करण्यात आलेला नाही. मात्र तेथील वाहतूक आणि इतर ध्वनीमुळे आवाजाची नोंद ७० डेसिबलच्या आसपास झाली आहे, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलाली यांनी दिली. यंदा प्रथमच शांततेत विसर्जन सोहळा पार पडला आहे. कुठेच गर्दी नव्हती. सर्व काही शिस्तीत होते. काही मोजकी तुरळक ठिकाणे वगळली तर यंदा प्रथमच विसर्जनादरम्यान ध्वनी प्रदूषणाची नोंद झालेली नाही.

रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वरळी नाका येथे फटाके फोडण्यात आले होते. यावेळी ९१ डेसिबल एवढा आवाज नोंदविण्यात आला. याबाबतची तक्रार रहिवाशांकडूनच करण्यात आली. वरळी डेअरी येथे आठ वाजता वाद्यवृंज वाजविण्यात आले. यावेळी १००.७ डेसिबल एवढया आवाजाची नोंद झाली.

..........................

खालील ठिकाणी कुठेच वाद्यवृंदाचा वापर करण्यात आलेला नाही. नोंदविण्यात आलेले प्रदूषण हे वाहतूकीचे आहे. वेळ सायंकाळी ६ ते रात्री १० (आवाज डेसिबलमध्ये)

माऊंट मेरी ६५.३खारदांडा ६८.३खार ६७.६जुहू कोळीवाडा ६८.१जुहू किनारा ६५जुहू तारा रोड ७७.२शिवाजी पार्क ५३वरळी नाका ६७.६गिरगाव चौपाटी ६७.५ 

टॅग्स :गणेशोत्सवप्रदूषणमुंबई