पहिल्यांदाच दहीहंडीच्या साहसी स्पर्धेचे आयोजन
By Admin | Updated: August 30, 2015 02:07 IST2015-08-30T02:07:36+5:302015-08-30T02:07:36+5:30
राज्य शासनाने साहसी खेळाचा दर्जा म्हणून मान्यता दिल्यानंतर पहिल्यांदाच बोरीवली आणि वांद्रे येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बोरीवली येथे गोविंदा पथकांना गुणांकनाद्वारे

पहिल्यांदाच दहीहंडीच्या साहसी स्पर्धेचे आयोजन
मुंबई : राज्य शासनाने साहसी खेळाचा दर्जा म्हणून मान्यता दिल्यानंतर पहिल्यांदाच बोरीवली आणि वांद्रे येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बोरीवली येथे गोविंदा पथकांना गुणांकनाद्वारे विजयी घोषित करण्यात येणार असून वांद्रे येथे कमीत कमी वेळात शिस्तबद्ध पद्धतीने थर रचणाऱ्या पथकाला विजेते घोषित करण्यात येईल.
युथ कल्चरल असोशिएशन आणि भाजपा बोरीवली विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने दहिहंडी साहसी खेळ स्पर्धेचे आयोजन रविवार, ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत सप्ताह मैदान युवक मंडळ मैदान, महावीर नगर, कांदीवली येथे करण्यात आले आहे. या ठिकाणी तीन गटात स्पर्धा होणार असून पहिल्या गटात पाच थर, दुसऱ्या गटात सहा थर आणि तिसरा गट महिला पथकांसाठी असणार आहे. या स्पर्धेत संघाकडून थर लावतांना बाळगोपाळांची संख्या, थर लावण्यासाठी व उतरविण्यासाठी त्यांना लागणारा वेळ, शिस्तबध्दता व कौशल्य यावर त्याचे गुणांकन होणार असून या आधारे सर्वोत्कृष्ट संघ निवडण्यात येणार आहे.
वांद्रे येथील रेक्लेमेशन मैदानात रविवारी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यावेळी कमीत कमी वेळात पाच थर लावणारे पथक विजयी ठरणार आहे. अशा गोविदा पथकांना तीन रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. या खेळात प्रथम येणाऱ्या पथकाला एक लाख रूपये रोख स्मृतीचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार असून दुसऱ्या क्रमांकासाठी
७५ हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ५० हजार रुपये देण्यात येतील. (प्रतिनिधी)