Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीच्या नादात आधी मुलगा, मग वडीलही बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 05:41 IST

वसईत राहणारे शैलेंद्र मोरे (४२) यांच्याकडे रविवारी स्वामी समर्थांचा पाठ आयोजिला होता.

नालासोपारा : वसई किल्ला येथील समुद्रकिनारी रविवारी संध्याकाळी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात १४ वर्षीय मुलगा पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेले वडीलही समुद्राच्या पाण्यात बुडाले. वसई पोलिस पिता-पुत्रांचा शोध घेत आहेत.

वसईत राहणारे शैलेंद्र मोरे (४२) यांच्याकडे रविवारी स्वामी समर्थांचा पाठ आयोजिला होता. त्यानंतर मुलगा देवेंद्र (१४) याच्यासोबत ते निर्माल्य समुद्रात टाकण्यासाठी वसई किल्ल्याजवळ गेले होते. निर्माल्य टाकल्यानंतर देवेंद्र जेटीवरून सेल्फी काढत होता. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी धावत त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारली पण दुर्दैवाने तेदेखील बुडाले. 

टॅग्स :सेल्फी