प्रचाराचा पहिलाचा रविवार ‘हिट’!

By Admin | Updated: September 29, 2014 05:21 IST2014-09-29T05:21:40+5:302014-09-29T05:21:40+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांतील राजकीय रणधुमाळीला चांगलीच सुरुवात झाली आहे.

The first Sunday of the campaign 'hit'! | प्रचाराचा पहिलाचा रविवार ‘हिट’!

प्रचाराचा पहिलाचा रविवार ‘हिट’!

सचिन लुंगसे, मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांतील राजकीय रणधुमाळीला चांगलीच सुरुवात झाली आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये पंचरंगी निवडणूक होणार आहे. त्यातच आॅक्टोबर हीटला सप्टेंबरच्या उत्तरार्धातच सुरुवात झाली आहे. शहराचे कमाल तापमान ३५ अंशावर पोहोचले आहे. परिणामी, राजकीय गरमागरमी आणि आॅक्टोबर हीटने आता मुंबापुरी चांगलीच तापू लागली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील ३६ विधानसभा मतदारसंघांतून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि मनसे या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपनगर जिल्ह्यात विधानसभेसाठी दाखल झालेल्या एकूण उमेदवारांचा आकडा ४७२ एवढा आहे. २७ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १ आॅक्टोबर ही शेवटची तारीख असली तरीदेखील राजकीय उमेदवारांच्या भेटीगाठींना ऊत आला आहे. उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास जोमाने सुरुवात केली असून, नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून या भेटीगाठींवर आणखी जोर देण्यात येत आहे.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचार आणि प्रसारासाठी विधानसभेसह वॉर्डस्तरीय रचना केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीने विधानसभा स्तरावर जी रचना केली आहे, ती प्रभावी आहे. त्यात निवडणूक प्रमुख, प्रचारप्रमुख, चौकसभाप्रमुख, बुथप्रमुख/डमी बुथप्रमुख, पोलिंग एजंट प्रमुख, परवानगी प्रमुख, आचारसंहिता प्रमुख, प्रोटोकॉल प्रमुख, रथप्रमुख, साहित्य प्रमुख, समन्वयक, ज्येष्ठ नागरिक प्रमुख, समाजप्रमुख आणि झोपडपट्टी वस्ती प्रमुख यांचा समावेश आहे. वॉर्ड स्तरावरदेखील ही रचना करण्यात आली असून, उर्वरित राजकीय पक्षांची रचना भाजपासारखी नसली तरी यातील प्रमुख पदांची रचना संबंधितांनी केली आहे.

Web Title: The first Sunday of the campaign 'hit'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.