ठाण्यात सकाळी साडेदहाला पहिला निकाल
By Admin | Updated: October 19, 2014 01:17 IST2014-10-19T01:17:02+5:302014-10-19T01:17:02+5:30
मतदानाचा निर्णय म्हणजेच ग्रॅण्ड फिनालेचा निर्णय आज दुपार्पयत लागणार असून त्याकडे सगळ्य़ांचे लक्ष वेधले गेले आहे.

ठाण्यात सकाळी साडेदहाला पहिला निकाल
सुरेश लोखंडे - ठाणो
जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांतील 238 उमेदवारांसाठी 59 लाख 9क् हजार 767 मतदारांपैकी 5क्.61 टक्के म्हणजे 3क् लाख नऊ हजार 835 जणांनी केलेल्या मतदानाचा निर्णय म्हणजेच ग्रॅण्ड फिनालेचा निर्णय आज दुपार्पयत लागणार असून त्याकडे सगळ्य़ांचे लक्ष वेधले गेले आहे. ही मतमोजणी रविवारी जिल्ह्यातील 15 ठिकाणी होत असून जास्तीतजास्त 31 ते कमीतकमी 19 फे:यांमध्ये ती होणार आहे.
विधानसभेच्या 18 जागांचे निकाल दुपारी 2 वाजेर्पयत लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सहा हजार 145 मतदान केंद्रांवर सुमारे सहा हजार 145 कंट्रोल युनिट यंत्रंद्वारे मतदान घेण्यात आले. सकाळी 8 वाजेपासून 15 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी तीन हजार 6क्क् अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. या कर्मचा:यांद्वारे एका कंट्रोल युनिटमधील सर्व उमेदवारांचे मतदान अवघ्या 1क् मिनिटांत सर्वाना पाहता येणार आहे. पहिल्या मशीनवरील मतमोजणीला जास्तीतजास्त 2क् मिनिटे लागण्याची शक्यता उपनिवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी व्यक्त केली. प्रत्येक उमेदवाराचे मतदान अवघ्या 15 सेकंदांमध्ये उघड होऊन एका मशीनमधील मतदान केवळ 1क् मिनिटांमध्ये सर्वासमोर नमूद करण्याचे नियोजन मतमोजणी केंद्रांत केले आहे. यानुसार, जिल्ह्यातील 238 उमेदवारांसाठी 3क् लाख नऊ हजार 835 मतांची मोजणी जास्तीतजास्त 31 ते कमीतकमी 19 फे:यांमध्ये पूर्ण करण्यात येईल. कंट्रोल युनिटमधील मतदान प्रत्येक उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी यांच्यासमक्ष उघड केले जाणार आहे.
3 वाजेर्पयत चित्र स्पष्ट होणार ?
4जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघातील 15 मतदान केंद्रांमधील मतमोजणी झाल्यानंतर फेरी (राउंड) याप्रमाणो मतमोजणी घोषित केली जाणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये
जास्तीतजास्त 444 मतदान केंद्रे असून कमीतकमी 277 मतदान केंद्रे आहेत.
4यानुसार, 18 मतदारसंघांत मतमोजणी नियोजनाप्रमाणो होऊन दुपारी 2.3क् वाजेर्पयत जिल्ह्यातील सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.